Download App

Hyderabad Gazette : निजाम राजवटीत 16 लाख 58 हजार कुणबी, विश्वास पाटलांचे संशोधन

ब्रिटिश राजवटीत तयार करण्यात आलेल्या हैद्राबाद गॅझेटमध्ये 17 जिल्ह्यांत 16 लाख 58 हजार 665 कुणबी असल्याची माहिती नुकतीच समोर आली.

  • Written By: Last Updated:

Vishwas Patil on Hyderabad Gazette : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटी (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण देण्याची मागणी केली. हैद्राबाद गॅझेटचा (Hyderabad Gazette) उल्लेख करत जरांगेंनी ही मागणी केली. दरम्यान, हैदराबाद गॅझेट नक्की काय आहे? त्यात नेमकं काय होतं? याबाबत साहित्यिक विश्वास पाटी (Vishwas Patil) यांनी काही संशोधन केलं. त्यांच्या संशोधनात सन 1881 मध्ये ब्रिटिश राजवटीत तयार करण्यात आलेल्या हैद्राबाद गॅझेटमध्ये निजाम राजवटीतील 17 जिल्ह्यांत 16 लाख 58 हजार 665 कुणबी असल्याची माहिती नुकतीच समोर आली.

विश्वास पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सन 1881 च्या गॅझेटमधील आकडेवारी समोर आणली आहे. ते म्हणाले, ब्रिटिश सरकारने जातीनिहाय जनगणना केली होती. 1850 च्या जवळपास सर विल्यम हंटर यांनी जनगणना सुरू केली होती. सन 1881 मध्ये जनगणनेच्या नोंदी प्रकाशित झाल्या. त्यालाच हैद्राबाद गॅझेट म्हटल्या जातं. या गॅझेटनुसार, निजामाच्या अधिपत्याखाली 17 जिल्हे होते. त्यात सध्याच्या मराठवाड्यातील जिल्ह्यांचा समावेश होता. या गॅझेटमध्ये जनगणना होतीच, याशिवाय, कोण विवाहित? कोण अविवाहित आणि विधुर यांचाही उल्लेख होता.

महिलांना दोन हजार रुपये, 25 लाखांपर्यंत मोफत उपचार, विधानसभेसाठी काँग्रेसचा जाहीरनामा 

1881 च्या आकडेवारीनुसार किती कुणबी होते?
पाटील यांनी सांगितलं की, निजाम राजवटीतील 17 जिल्ह्यांची लोकसंख्या सुमारे 98 लाख 45 हजार 594 होती. यामध्ये कुणब्याची संख्या अंदाजे 16 लाख होती. ब्राम्हण 2 लाख 59 हजार 147, राजपूत 49 हजार, बैरागी – 5 हजार 57, कुणबी 16 लाख 58 हजार 665,
मराठा 3 लाख 69 हजार 636, बेरड 1 लाख 19 हजार, माळी -83 हजार, गोसावी – 21 हजार, कोष्टी 79 हजार, महार 8 लाख 6 हजार होते.

छत्रपती संभाजीनगरची लोकसंख्या किती होती?
पाटील म्हणाले, औरंगाबाद जिल्ह्याची आकडेवारी 7 लाख 30 हजार होती. तर मराठा आणि कुणबींची संख्या 2 लाख 88 हजार 825 होती. यात पुरुष 1 लाख 47 हजार होते, तर महिलांची संख्या 1 लाख 41 हजार 283 होती.
1881 हैद्राबाद गॅझेटनुसार, नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या 6 लाख 36 हजार होती. नांदेड जिल्ह्यात उस्माननगर, हतगाव, दहिसर, बेलोरी, देगलूर कंधार, नांदेड हे तालुके होते.

पाटील म्हणाले, विशेष म्हणजे हे जिल्हे महाराष्ट्रात आल्यावर या नोंदी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या. ते रेकॉर्ड आमच्याकडे उपलब्ध आहे. याशिवाय हैदराबादकडे आणखी काही रेकॉर्ड असेल तर ते पुढे आणावेत, त्याचाही फायदा होईल, असंही पाटील म्हणाले.

follow us

संबंधित बातम्या