साहित्य अकादमी म्हणजे कंपूशाही, असे म्हणणारे विश्वास पाटीलच कार्यकारी मंडळात

साहित्य अकादमी म्हणजे कंपूशाही, असे म्हणणारे विश्वास पाटीलच कार्यकारी मंडळात

मुंबई : देशाच्या साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठित संस्था मानल्या जाणाऱ्या साहित्य अकादमीच्या (Sahitya Akademi) अध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पडली. साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी हिंदी साहित्यिक माधव कौशिक यांची निवड झाली तर उपाध्यक्षपदी दिल्ली विद्यापीठाच्या प्रोफेसर कुमुद शर्मा यांची निवड झाली. साहित्य अकादमीच्या इतिहासात पहिल्यांदाच या पदावर एका महिला लेखिकेची निवड झाली. दरम्यान, झाडाझडतीकार विश्वास पाटील (Vishwas Patil) यांचीही साहित्य अकादमीच्या केंद्रीय कार्यकारी मंडळावर बिनविरोध निवड झाली. त्यांनी स्वत: त्यांच्या सोशल मीडीया अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली.

पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं की, भारतभरातील साहित्यिकांकडून माझी साहित्य अकादमीच्या केंद्रीय कार्यकारी मंडळावर बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. गेल्या २५ वर्षाहून अधिक काळ मी सातत्याने केलेले लेखन, आचार्य अत्रे, खांडेकर, अण्णाभाऊ साठे, साने गुरुजी, कुसुमाग्रज, वसंत कानेटर यांच्या लेखनातून मला मिळालेली प्रेरणा व भारतभर सर्व भाषांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या, मास आणि क्लास या दोन्ही वर्गाला पसंत पडलेल्या माझ्या कादंबऱ्या या सगळ्याची पुण्याई या पाठीमागे असल्याचं त्यांनी म्हटलं. ते लिहितात, शरदचंद्र चॅटर्जी, शेक्सपियर, थॉमस हार्डी प्रेमचंद, काजी नजरुल इस्लाम इत्यादींपासून प्रेरणा घेऊन काही चार अक्षरे गिरवता आली, माझ्यासारख्या चौदाशे लोकवस्तीच्या खेड्यातून आलेल्या एका किसान पोरास काय हवं, असं त्यांनी लिहिलं.

दरम्यान, यांच्या या निवडीबद्दल मराठी साहित्य जगतातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षावर होत आहे. मात्र, साहित्य अकादमी म्हणजे नुसती कंपूशाही आहे, अशी टीका विश्वास पाटील यांनी साहित्य अकादमीवर केली होती. आणि आता त्यांनीच केंद्रीय कार्यकारी मंडळावर जाणं पसंत केल्यानं काही साहित्यिकांकडून आश्चर्य व्यक्तं केलं जातं. त्यामुळे साहित्य अकादमीच्या केंद्रीय कार्यकारी मंडळवार आपली वर्णी लागावी, यासाठीच तर पाटलांनी अकादमीवर टीका केली होती का? असा सवालही उपस्थित होत आहे.

शाळेत खोटा इतिहास शिकवला जातोय, शिक्षण पद्धतीवर कालिचरण महाराजांची टीका

विश्वास पाटील यांची साहित्य संपदा –
विश्वास पाटील यांचा जन्म 28 नोव्हेंबर 1959 साली झाला. तसे विश्वास पाटील हे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आहेत. ऐतिहासिक कादंबरी लेखन हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पानिपत, संभाजी, महानायक, छावा, पागिरा, चंद्रमुखी ह्या त्यांच्या वाचनीय कांदबऱ्या आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील त्यांची महानायक ही कादंबरी लोकप्रिय ठरली. त्यांच्या साहित्यकृतींचे अनेक भाषांत अनुवाद झाले आहेत. त्यांच्या झाडाझडती या धरणग्रस्तांवरील कांदबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.  त्यांच्या चंद्रमुखी कांदबरीवर आधारीत नुकताच चंद्रमुखी हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube