Pune Municipal Corporation Election : आज राज्यातील पुणेसह 29 महापालिका निवडणुकीसाठी मतदानाची सुरुवात झाली असून या निवडणुकीचे निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर होणार आहे. तर दुसरीकडे तब्बल 9 वर्षांनंतर पुणे महापालिकेसाठी पुणेकरांना मतदान करण्याची संधी मिळाली आहे. पुणे महापालिकेसाठी शेवटची निवडणूक 2017 मध्ये झाली होती. या निवडणुकीत भाजपने 97 जागांवर विजय मिळवला होता तर आता तब्बल 9 वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी (Pune Municipal Corporation Election) आज (15 जानेवारी) सकाळी 7.30 ला मतदानाची सुरुवात झाली असून संध्याकाळी 5.30 पर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. आज पुण्यातील 4000 मतदान केंद्रावर 35 लाख मतदार मतदान करणार असून ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी मतदान करण्यासाठी दिसून येत आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली असल्याने या निवडणुकीत आता भाजपविरुद्ध (BJP) राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे भाजप या निवडणुकीत 120 ते 125 जागा जिंकणार असल्याचा विश्वास पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी लेट्सअप मराठीशी (Letsupp Marathi) बोलताना व्यक्त केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
मोठी बातमी , 29 महापालिका निवडणुकीसाठी मतदानाची सुरुवात, कोण मारणार बाजी?
आक्रमक प्रचार
9 वर्षांनंतर होत असलेल्या पुणे महापालिका निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आक्रमक प्रचार करत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर अजित पवार यांना पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यासह राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पुण्याचे अनेक नेत्यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले असल्याने पुण्यातील राजकार तापला आहे.
