Download App

वाल्मिक कराडचे एफसी रोडवरील ऑफिस एका महिलेच्या नावावर, दोघांचा संबंध काय?

पुण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत कराडची स्थावर मालमत्ता आढळून आली. यापैकी एक संपत्ती फर्ग्युसन रोडवर आणि दुसरी वाकड येथे आहे.

  • Written By: Last Updated:

Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाचा सुत्रधार असल्याचा ठपका असलेल्या वाल्मिक कराडने (Walmik Karad) दहशत करून करोडोंची संपत्ती जमवल्याचा दावा केला जातोय. कराडच्या अनेक ठिकाणी मालमत्ता असल्याचं पुढं आलं. पुण्यातील (Pune) प्राइम लोकेशनवर त्याने ऑफिस स्पेस विकत घेतल्याचा दावा केला जातोय. फर्ग्युसन रस्त्यावर (Ferguson Street) एका महिलेच्या नावार त्याने ही गुंतवणूक केली. दरम्यान, ही महिला कोण आहे, या दोघांचा संबंध काय आहे, याची आता सुरू झाली.

रोहित शर्मा पाकिस्तानमध्ये जाणार? BCCI चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत 

कराडची गडगंज मालमत्ता असल्याचे आरोप होत आहे. कराडची पुण्यात संपत्ती असल्याचेही दावे केले जात आहे. सातत्याने कराड बाबत अनेक नवनवे खुलासे समोर येत आहेत. आता पुण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत कराडची स्थावर मालमत्ता आढळून आली. यापैकी एक संपत्ती फर्ग्युसन रोडवर आणि दुसरी वाकड येथे आहे. कराडने पुण्यातील प्राईम लोकेशन असलेल्या फर्ग्युसन रोडवर ऑफीस घेतल्याचा दावा होतोये. या ठिकाणी मालमत्ता खरेदी करण्यासाठी एका महिलेनं मदत केल्याचं समोर आलं.

फर्ग्युसन रोडवरील एका इमारतीचे काम सुरू असून कराडने तिथे दोन ऑफिस घेतले आहेत, असा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता. याबाबत त्यांनी पैठणच्या सभेत दावा केला होता. तर ही गुंतवणूक एका महिलेच्या नावावर करण्यात आल्याचे आरोप धस यांनी केले होते. यानंतर या महिलेचे नाव समोर आले आहे. वाल्मिक कराडची गुंतवणूक आपल्या नावे करणाऱ्या महिलेचे नाव ज्योती जाधव आहे.

‘फक्त फोन कॉलवर कराडला आरोपी बनवलं का?’, कोर्टाचा तपास अधिकाऱ्यांना सवाल… 

कराडने ज्योती जाधव नावाच्या महिलेच्या नावावर दोन ऑफीस खरेदी केली असून याचे कागदपत्रे समोर आलीत. ज्योती जाधव नावाच्या एका महिलेने फर्ग्युसन रोडवरील कुशल वॉल स्ट्रीट या इमारतीचे काम सुरू असतांनाच गुंतवणूक केली. या महिलेनं इथं ऑफिस नंबर ६१०सी अपार्टंमेट खरेदी केलं. ४५.७१ चौरस मीटर कार्पेट एरिया या ऑफिसचा आहे. या जागेला बाल्कनी आणि पार्किंगची जागा आहे.

तर दुसरी मालमत्ता ही ६११बी या ऑफीसची असून त्याचा एरिया ५४.५१ चौरस मीटर आहे. त्या जागेलाही बाल्कनी आणि खाली पार्किंगची व्यवस्था आहे. तर या मालमत्तेसाठी २५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, ज्योती जाधव या महिलेचा आणि कराडचा यांचा काय संबंध आहे? याचे उत्तर अद्याप कळलेले नाही आणि ईडीकडून त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे.

वाकडचा ४ बीएचके प्लॅट सील
वाल्मिक कराड आणि त्याची पत्नी मंजली यांची पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात पार्क स्ट्रीट नावाच्या उच्चभ्रू सोसायटीत मालमत्ता आहे. येथे ४ बीएचकेचा फ्लॅट असून तो आता प्रशासनाने सील केला आहे. कर न भरल्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने ही कारवाई केली आहे.

दरम्यान, कराडच्या अनेक ठिकाणी मालमत्ता असल्याचं पुढं आलं. त्यामुळं सर्व प्रकरणाची ईडीमार्फत (ED) चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधकांकडून होतेय. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी कराडच्या या सर्व मालमत्तांची ईडीकडून चौकशी करावी, अशी मागणी केली. कराडच्या मालमत्ता उघडकीस आल्यामुळे आता ईडीकडून त्यांची चौकशी केली जाईल का? हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us