‘फक्त फोन कॉलवर कराडला आरोपी बनवलं का?’, कोर्टाचा तपास अधिकाऱ्यांना सवाल…

  • Written By: Published:
‘फक्त फोन कॉलवर कराडला आरोपी बनवलं का?’, कोर्टाचा तपास अधिकाऱ्यांना सवाल…

Santosh Deshmukh Murder Case Hearing : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला (Walmik Karad) अखेर ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कराडला आज बीड जिल्हा न्यायालयात (Beed District Court) हजर करण्यात आले होते. यावेळी एसआयटी (SIT) आणि सरकारी वकिलांनी महत्त्वाचे युक्तिवाद केले. दरम्यान, हे युक्तीवाद ऐकल्यानंतर हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला फक्त दोन कॉलच्या आधारावर आरोपी बनवले का? असा सवाल कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना केला.

मोठी बातमी! वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी, बीड जिल्हा न्यायालयाचा निर्णय 

बीड येथील मकोका न्यायालयात इन कॅमेरावर सुनावणी पार पडली. कोर्टरूममध्ये फक्त न्यायाधीश, आरोपी, आरोपीचे वकील, तपास अधिकारी आणि सरकारी वकील उपस्थित होते. यावेळी एसआयटीने वाल्मिकी कराडच्या पोलिस कोठडीसाठी ९ ते १० कारणे सादर केली. तर दुसरीकडे, वाल्मिकी कराडच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावले आणि कराड यांची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कराडला २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

‘देशमुख, राऊतांना ईडी लावता, मग कराडला का नाही?’, खासदार सुळेंचा थेट सवाल 

एसआयटीचे वकिल काय म्हणाले?
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळी वाल्मिकी कराडचं या प्रकरणातील इतर आरोपींशी फोनवरून बोलणं झालं होतं. ९ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते ३.१५ च्या दरम्यान संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले. त्याच दिवशी दुपारी ३.२० ते ३.४० दरम्यान, आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये फोनवर संभाषण झाले. एसआयटीने न्यायालयात दावा केला की, या तीनही आरोपींमध्ये सुमारे १० मिनिटे संभाषण झाल्याचा दावा करत कराडची १० दिवसांची पोलीस कोठडी मागितली. यावेळी वकील अशोक कवडे आणि सिद्धेश्वर ठोंबरे यांनी न्यायालयात वाल्मिक कराडची बाजू मांडली.

यावेळी सरकारी वकिलांनी वाल्मिक कराड याच्याविरुद्ध मकोका अंतर्गत खटला का दाखल केला? ही माहिती न्यायालयालाही दिली. सरकारी वकिलांनी वाल्मिक कराडविरुद्ध यापूर्वी दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांची माहिती न्यायालयासमोर सादर केली आणि त्या आधारेचं कराडविरुद्ध मकोका कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्याचं सांगितलं.

तसेच सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे फरार असताना त्यांना कोणी मदत केली, याचा शोध घ्यायचा आहे. तसेच, वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात नेमका काय संबंध आहे? याचा तपास करायचा असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला

तपास अधिकाऱ्यांना कोर्टाचा सवाल…
त्यावर हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला फक्त दोन कॉलच्या आधारावर आरोपी बनवले का? सरपंच देशमुख हत्येच्या गु्न्हात वाल्मिक कराडचा सहभाग होता याची खात्री केली का, असे प्रश्न न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना विचारले आहेत.

आरोपींना वाल्मिक कराडचे नाव घेतले…
तर कोणत्याही आरोपींना वाल्मिक कराडचे नाव घेतले नाही, अशी बाजू कराडच्या वकिलांनी न्यायालयात मांडली. वाल्मिकी कराडची अटक बेकायदेशीर आहे. त्याच्याविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नाहीत. त्याच्यावर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही. कोणत्याही आरोपीने वाल्मिकी कराडचे नाव घेतले नाही, असा युक्तीवाद कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube