Koregaon Bhima Case : ‘फडणवीसांना साक्ष देण्यासाठी बोलवावे’; आंबेडकरांची मागणी

Prakash Aambedkar On Devendra Fadanvis :  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज कोरेगाव- भीमा चौकशी आयोगाला एक प्रतिज्ञापत्र दिले. यामध्ये त्यांनी मी सगळ्या घटना सांगितल्या असल्याचे म्हटले आहे. ग्रामीण पोलिसांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले असून त्यात भिडे आणि एकबोटे यांनी प्रमुख आरोपी दाखवले आहे आणि कारवाई करू असे सांगितले आहे, असे आंबेडकर म्हणाले. कोरेगाव […]

Letsupp Image   2023 07 24T133657.644

Letsupp Image 2023 07 24T133657.644

Prakash Aambedkar On Devendra Fadanvis :  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज कोरेगाव- भीमा चौकशी आयोगाला एक प्रतिज्ञापत्र दिले. यामध्ये त्यांनी मी सगळ्या घटना सांगितल्या असल्याचे म्हटले आहे. ग्रामीण पोलिसांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले असून त्यात भिडे आणि एकबोटे यांनी प्रमुख आरोपी दाखवले आहे आणि कारवाई करू असे सांगितले आहे, असे आंबेडकर म्हणाले.

कोरेगाव भीमा दंगलीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 40 किलोमीटरच्या परिसरात होते. त्यांना दंगलीची माहिती होती का? हे पाहावे लागेल. कुणीतरी जाणीवपूर्वक माहिती दाबली का?, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच फडणवीस यांनी साक्ष देण्यासाठी यावे अशी आम्ही मागणी करतो आहोत, असे ते म्हणाले.  त्यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे.

अध्यक्षांनी फटकरालं, अजितदादांनी झापलं, सामंतांनी समजावलं : रोहित पवारांचं उपोषण मागे

यावेळी आंबेडकर यांनी काही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, “संभाजी भिडे यांना  अटक का नाही झाली? मी काही chat पण दिले आहेत आणि ते कोणाचे आहेत  हे सांगावं. सांगली मधून त्यावेळी काही फोन आले आहेत का?  सांगलीहून पुण्यात ज्या गाड्या आल्या त्याचे रेकॉर्ड आहे का हे मी विचारलं आहे. सरकारचे अपयश आहे का? आणि ते कुठल्या स्तरावर आहे. गृह सेक्रेटरी, होम intelligence यांना ते कळवले आहे का? याबाबत डायरेक्टर इंटेलिजन्सकडून रिपोर्ट मागवून घ्यायला हवा.”

ज्येष्ठ अभिनेते Dr. Mohan Agashe यांचा ‘पुण्यभूषण’ पुरस्काराने सन्मान! अनुपम खेर पोस्ट करत म्हणाले…

यावेळी त्यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याबाबत मोठे विधान केले आहे. अजित पवार मुख्यमंत्री होतील की नाही हे तीनच लोकं सांगू शकतात. एक पंतप्रधान नरेंद्र मोदी, दुसरे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि खुद्द अजित पवार हे तीन लोकं या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील. चौथा माणूस यावर उत्तर देऊ शकणार नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version