Download App

पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; IMD चा इशारा

  • Written By: Last Updated:

Rain Updates : सध्या राज्यात ढगाळ वातावरण आहे. अनेक जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. पावसाचा जोर वाढत असतांनाच आता पुढील ५ दिवस राज्यात मुसळधार पावसाचा (Heavy rain) इशारा हवामान खात्याने (IMD) दिला. अरबी समुद्राद झालेल्या बदलांमुळं राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याचं म्हटलं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, पालघर, पुणे, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात चांगला पाऊस पडेल. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट (Orange alert for Pune district) दिला आहे. (Warning of heavy rain From IMD for next 5 days Orange alert for Pune district)

पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

शहरासह सध्या संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. या काळात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुढील आठवडाभर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील उत्तरेकडील तालुक्यातील घाट भागात विशेषतः उद्या रात्री मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, पुणे जिल्हा आपत्ती निवारण आराखड्यानुसार, स्थानिक अधिकाऱ्यांना प्रचलित धोक्यांचे मूल्यांकन करून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व रुग्णालयांमध्ये पुरेसा कर्मचारी आणि आवश्यक औषधांचा साठा करण्यात आला आहे. रुग्णवाहिका कार्यरत असून त्यात संपूर्ण इंधन आहे. अधिकाऱ्यांना मुख्यालयात राहून सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. तालुका अधिकारी आज तयारीची पाहणी करणार आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 18 ते 23 जुलै या कालावधीत पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस पडले. तर 19 जुलै आणि 20 जुलैला लोणावळा, खंडाळा, माथेराण, मुळसी परिसरात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला. 5 दिवस राज्यात चांगला पाऊस होणार आहे. आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावसाचा जोर वाढणार आहे. तर विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आणि आजूबाजूच्या काही भागांत मध्यम ते जोरदार ढग पसरले असून येत्या 2 तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय, पुढचे 2 दिवस मध्य भारताच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकण, सातारा, पुणे, नाशिक येथील घाट परिसरात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.

Tags

follow us