GBS Updates : राज्यात गुलियन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण दिवसागणिक वाढत चालले आहेत. या आजाराचा (Guillain Barre Syndrome) प्रादुर्भाव पुण्यात जास्त आहे. काही रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. हा आजार संसर्गजन्य नाही. मग हा आजार अचानक कसा समोर आला. यामागे काय कारण आहे असा प्रश्न आरोग्य यंत्रणांना पडला आहे. आता या प्रश्नाचं मूळ कारण शोधून काढण्यात आरोग्य यंंत्रणांना यश आलं आहे. जीबीएस ग्रस्त रुग्णांमध्ये प्रामुख्याने कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी आणि नोरोव्हायरसचाड संसर्ग आढळून आला आहे. हेच जीबीएस उद्रेकाचे कारण आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने शुक्रवारी दिली.
पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील जीबीएस रुग्णांची तपासणी केली. यातील 25 रुग्णांमध्ये कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू संसर्ग दिसून आला. तसेच 11 रुग्णांना नोरोव्हायरस संसर्ग झाल्याचे दिसून आले. या भागातील पाण्याच्या विविध स्त्रोतांतून पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. या पाण्याचीही तपासणी करण्यात आली होती. यातील 40 नमुन्यांचे अहवाल मिळाले आहेत. यापैकी 8 नमुन्यांत कोलिफॉर्म, 25 मध्ये ई कोलाय व कोलिफॉर्म, 6 नमुन्यांत नोरोव्हायरस तर एका नमुन्यात कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी आढळून आला आहे अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.
दुर्मिळ मज्जातंतू विकार म्हणजेच अर्थात जीबीएस हा आजार संसर्गजन्य नसून तो जंतू संसर्गाच्या घटनेनंतर संसर्गोत्तर (पोस्ट इन्फेक्शन) गुंतागुंतीचा आजार मानला जातो. एकदम अधिक संख्येने या आजाराच्या नोंदी आढळल्या असल्या तरी हा आजार संसर्गजन्य नाही. एखादा जंतू संसर्ग झाल्यानंतर रोगप्रतिकार शक्ती शरीराचा बचाव करते. पण हा एक असा दुर्मिळ आजार आहे, ज्यात हीच रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्याच शरीरातील मज्जासंस्थेवर हल्ला करते.
पु्ण्यात जीबीएसचं थैमान, कोल्हापूरातही शिरकाव; केंद्राचे पथक राज्यात दाखल
परिणामी नसांना नियमित कार्य करता येत नाहीत. त्यामुळे मेंदूच्या सूचनांचं पालन करणं स्नायूंना शक्य होत नाही, मेंदूला इतर शरीराकडून मिळणारे संकेत कमी होतात. त्या व्यक्तीच्या स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण राखणाऱ्या, वेदना, तापमान, स्पर्श या सगळ्याची जाणीव करून देणाऱ्या नसांचे कार्य कमी होते. दरम्यान, सुरवातीला या आजाराची कारणे शोधली गेली तेव्हा त्यात दूषित पाणी हे त्याचं कारण समोर आलं होतं.
दरम्यान, सुरवातीला या आजाराची कारणे शोधली गेली तेव्हा त्यात दूषित पाणी हे त्याचं कारण समोर आलं होतं. सहसा अस्वच्छता, पाणी दूषित असणे हे या आजाराला कारणीभूत ठरु शकतात. वेळीच उपचार केल्यास त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते. तसेच वेळेत उपचार केल्यास ९५ टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. या रुग्णांच्या उपचारामध्ये शरिरातील प्लाझमा बदलणे, हिमोग्लोबिन वाढवणे व व्हेटींलेटर लावणे हे तीन उपचार करावे लागतात.