Download App

Chinchwad By Election : राहुल कलाटे कुणाचं आव्हान मानतात अश्विनी जगताप की नाना काटे?

पुणे : चिंचवडची जनता सहानुभूतीकडे नाहीतर उमेदवार पाहून मतदान करणार असल्याचा विश्वास चिंचवड पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी व्यक्त केला आहे. राहुल कलाटे यांनी लेट्सअपशी संवाद साधला आहे.

कलाटे बोलताना म्हणाले, चिंचवडची जनता सुज्ञ असून इथली जनता काम करणाऱ्यालाच मतदान करणार आहे. जशी इतर उमेदवारांना सहानुभूती मिळणार आहे. तशीच सहानुभूती मलाही मिळणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.

धर्मगुरुकडून 4 हजार मुलांचं लैंगिक शोषण…

यावेळी कलाटे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. शहरात मोठ-मोठे प्रश्न प्रलंबित आहेत. लॉयन ऑर्डर, शहरात पाणीपुरवठ्याचा मोठा प्रश्न प्रलंबित आहे. भाजप आणि राष्ट्रवादीकडून पाणी देण्याबाबत घोषणा केली होती, पण ते शहराला पाणी देऊ शकले नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Devendra Fadnavis : ‘ते स्वत:चे घर सांभाळू शकत नाही’, फडणवीसांची नाव न घेता अजित पवारांवर टीका

दरम्यान, 2014 साली मी निवडणुक लढवली तेव्हा मला 65 हजार मते मिळाली होती, त्यानंतर 2019 ला मला 1 लाख 12 हजार मते मिळाल्याने माझ्याबद्दल मतदारांमध्ये सहानुभूती असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने कलाटे यांनी बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात दंड थोपटले आहेत. चिंचवड पोटनिवडणुकीच्या रिंगणात भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप तर महाविकास आघाडीकडून नाना काटे उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चूरशीची होणार असल्याचं मानलं जातंय.

राहुल कलाटे यांच्यासमोर नाना काटे आणि आश्विनी जगताप यांचं मोठं आव्हान उभं असून नुकताच त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठींबा मिळाल्याची माहिती त्यांनी दिलीय.

Tags

follow us