धर्मगुरुकडून 4 हजार मुलांचं लैंगिक शोषण…
लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबत पोर्तुगालमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. एका कॅथलिक धर्मगुरुकडून 4 हजार 815 मुलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप स्वतंत्र आयोगाकडून करण्यात आला आहे.
मुलांच्या लैंगिक शोषणासंदर्भात 2022 पासून स्वतंत्र्य आयोगाकडून चौकशी सुरु करण्यात आली होती. त्यानंतर पीडित मुलांच्या जबाबनूसार हा अहवाल सादर करण्यात आल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.
मी जितेंद्र आव्हाडांना ठोकणार, धमकी प्रकरणात नवा ट्विस्ट
पोर्तुगालमधील बाल मानसोपचार तज्ज्ञ पेड्रो स्ट्रेच यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र आयोगाकडून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार मागील 70 वर्षांत कॅथलिक धर्मगुरुंगकडून मुलांचं लैंगिक शोषण करण्यात येत आहे. स्वतंत्र आयोगाच्या अहवालात काही घटनांसंदर्भातच सांगण्यात आलं असून अशा अनेक घटना असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Prithvi Shaw : मुंबईत क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या गाडीवर हल्ला
आयोगाच्या अहवालानुसार लैंगिक शोषण झालेल्या पीडित मुलांचं वय 10 ते 14 असल्याचं उघड झालं आहे. तर दुसरीकडे आम्ही लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल संवेदना व्यक्त करीत असल्याची भावना बाल मनोचिकित्सक पेड्रो स्ट्रेच यांनी व्यक्त केली आहे.
2021 मध्ये फ्रांन्सचा एक अहवाल समोर आला होता. या अहवालामध्ये 3 हजार कॅथलिक धर्मगुरुंकडून 2 लाखांपेक्षा अधिक मुलांशी लैंगिक शोषणाबद्दल बोललं गेलं होतं. त्यानंतर आयोगाकडून 2022 मध्ये काम करण्यास सुरुवात करण्यात आली होती.
Chandrashekhar Bavankule : गिरीश बापट आजारी… तरी त्यांना प्रचाराला उतरू का?
या संपूर्ण प्रकरणावरुन सरकारी वकिलांनी चौकशी केली. तेव्हा अशी प्रकरणं मागील 20 वर्षांपासून असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणांची सुनावणी होऊ शकते पण आरोपींवर कारवाई नाही होऊ शकत, असं वकीलांकडून सांगण्यात आलं होतं.
दरम्यान, लैंगिक शोषणाचे नियम बदलले पाहिजेत, अशी मागणी आयोगाकडून करण्यात आली आहे. कारण याआधीही ज्या धर्मगुरुंनी हे गुन्हे केलेले आहेत त्यांनाही शिक्षा मिळाली पाहिजे, असं मत आयोगाकडून व्यक्त करण्यात आलं आहे.