Download App

अजित पवारांनी शब्द पाळला नाही, 1 जानेवारीनंतर जाब विचारणार; विजयस्तंभ समितीचा इशारा

Bhima Koregaon : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शौर्य स्तंभाला (vijay stambh) 100 कोटी देण्याचं जाहीर केलं होतं पण त्यांनी शब्द पाळला नाही. 1 जानेवालीला आम्हा त्यांचा निषेध करणार होतो पण महाराष्ट्रातील वातावरण खराब असल्याने हे करणे उचित नाही. पण 1 जानेवारीनंतर आम्ही त्यांना जाब विचारणार आहेत, असा इशारा कोरेगाव भीमा (Bhima Koregaon) विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी दिला.

सर्जेराव वाघमारे म्हणाले की अजित पवार यांनी विजयस्तंभाचा विकास आराखडा तयार करायला सांगितला होता. यासाठी 100 कोटींचा निधी देतो असे सांगितले होते. पण जिल्हाधिकारी आणि समाज कल्याण विभागाकडे माहिती अधिकारात विचारले असता एकही रुपया त्यांच्याकडे वर्ग झाला नाही असं पत्र मिळालं आहे. कोर्टाची केस असल्याने आम्ही पैसे दिले नाहीत, असं त्यांनी सांगितले. पण दुसऱ्या ठिकाणी जागा हस्तांतरित करायची होती ती जागा देखील अजून हस्तांतरित झालेली नाही.

Nagar Urban Bank : ठेवीदार संतापले…थेट दिवंगत दिलीप गांधींच्या बंगल्यावरच निषेध मोर्चा

अजित पवार यांना तीन ते चार वेळेस पत्रव्यवहार केला होता. धनंजय मुंडे हे समाज कल्याण विभागाचे मंत्री असताना त्यांना देखील पत्र दिले होते. पण त्यांनी फक्त करतो एवढं अश्वासन दिले. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी तुळापूर आणि भिमा कोरेगाव या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी निधी मंजूर केला होता. तुळापूरचे काम सुरु झाले पण भिमा कोरेगावचे काम सुरु झाले नाही. त्यामुळे हे सरकार विजयस्तंभाविषयी अनुकूल नाही, असा आरोप सर्जेराव वाघमारे यांनी केला.

भीमा कोरेगाव येथे दरवर्षी 1 जानेवारी रोजी लाखो आंबेडकरी अनुयायी विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी येत असतात. कोरेगाव भीमा, पेरणे गाव यासह परिसरातील सरपंच, सर्व पक्ष, संघटनाचे प्रमुख तसेच ग्रामस्थ विजय स्तंभास येणाऱ्या अनुयायांचे स्वागत अतिशय भव्य स्वरूपात करणार असल्याचे सर्जेराव वाघमारे यांनी सांगितले आहे.

“सिंघानियांनी अत्याचार केले, पण अंबानींमुळे वाचलो” : नवाज मोदींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

शिवाय कोरेगाव भीमा विजय जयस्तंभ सेवा संघाच्या वतीने स्टॉल धारकांना योग्य जागा देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. तसे पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख व संबंधीत अधिकारी यांचे बरोबर चर्चा करून लवकरच निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.

यावर्षी प्रथमच कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे वतीने जयस्तंभाचे प्रतिकृतीचे दोन सेल्फी पॉईंट पूर्व आणि पश्चिम बाजूला तयार करण्यात येणार आहे. त्याचा येणाऱ्या अनुयायांनी लाभ घेतला जावा. त्याबरोबरच कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने कोरेगाव भीमा जयस्तंभाचा इतिहास व माहिती फलक ठराविक ठिकाणी शासनाची परवानगी घेऊन लावण्यात येणार आहे, अशी माहिती वाघमारे यांनी दिली.

Tags

follow us