Download App

आमच्यासोबत येण्यासाठी शरद पवार यांना आम्ही साकडं घातलं; मुश्रीफांचा गौप्यस्फोट

Hasan Mushrif on Sharad Pawar : शरद पवार (Sharad Pawar) जोपर्यंत भाजपसोबत येणार नाहीत तोपर्यंत अजित पवार (Ajit Pawar) यांना आम्ही मुख्यमंत्री करणार नाहीत. अशी अट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी घातली आहे, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी केला आहे. यावर मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले की साहेबांनी आमच्यासोबत यावं, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. आम्ही त्यांना साकडं घातलं आहे. आमचं कुटुंब एक आहे. राष्ट्रवादी एक आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रसिद्ध उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरी गुप्त भेट झाली होती. अजित पवारांच्या बंडखोरीनंतर ही त्यांची चौथी भेट आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या बंडखोरीबद्दल राजकीय वर्तुळात संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीतील बंडाला शरद पवारांचा पाठिंबा आहे का? अजित पवार आणि शरद पवार यांनी ठरवून ही भूमिका घेतली आहे का? असे तर्क लावले जात आहेत.

राष्ट्रवादीला वगळून ठाकरे अन् काँग्रेसचा ‘प्लॅन बी’? शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर

तर काही राजकीय तज्ञांचे मत आहे की अजित पवार हे शरद पवारांना भाजपसोबत जाण्यासाठी आग्रह करत आहेत. यासाठी ते भेटी घेत आहेत पण मोठे पवार अजितदादांचा प्रस्ताव स्विकारत नाहीत. त्यामुळे वेगवेगळे प्रस्ताव घेऊन अजित पवार हे शरद पवारांना भेटत असल्याचे बोलले जाते.

Jitendra Awhad : ‘शरद पवारांना ऑफर म्हणजे वर्षातला सर्वात मोठा जोक’

विजय वडेट्टीवार काय म्हणाले होते?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोबत आले तरच अजित पवारांना मुख्यमंत्री होता येईल ही अट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांसोबत ठेवली आहे. त्यामुळे अजित पवार हे शरद पवारांचे समर्थन मिळवण्यासाठी वारंवार त्यांची भेट घेत आहेत.

Tags

follow us