राष्ट्रवादीला वगळून ठाकरे अन् काँग्रेसचा ‘प्लॅन बी’? शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर
छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे, राष्ट्रवादीला वगळून ठाकरे आणि काँग्रेस ‘प्लॅन बी’ तयार करत आहेत, पण अशा केवळ चर्चाच आहेत. यात वस्तूस्थिती नाही. महाविकास आघाडीमध्ये कोणतीही अस्वस्थता नाही, असा खुलासा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. उद्याच्या बीडमधील सभेपूर्वी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील आणि देशांतील विविध राजकीय विषयांवरही सविस्तर भाष्य केले. (NCP Chief Sharad Pawar talk on congress and shiv sena plan be without NCP)
तुमच्या आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाचा ‘प्लॅन बी’ तयार करणे सुरु आहे, ते वेगळा फॉर्म्यूला तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत का? असा सवाल शरद पवार यांना विचारला. यावर ते म्हणाले, या केवळ चर्चा आहे. ही वस्तूस्थिती नाही. माध्यमांमधील व लोकांमधील उथळा चर्चांना काही अर्थ नाही. संजय राऊतांनीही त्यांच्या विधानामध्ये दुरुस्ती केली आहे, असे पवार म्हणाले.
Sharad Pawar : फडणवीसांचा फेमस डायलॉग उच्चारत पवारांनी सांगितलं PM मोदींचं भवितव्य
ठाकरे अन् काँग्रेसचा ‘प्लॅन बी’ :
उपमुख्यमंत्री आणि बंडखोर नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत होत असलेल्या भेटींनंतर महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांचा शरद पवारांवरील विश्वास काहीसा डळमळीत झाला आहे. त्याचमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसने शरद पवारांना बाजूला ठेऊन महाविकास आघाडीचा विचार सुरु केला आहे. शरद पवार यांनी ऐनवेळी महाविकास आघाडीची साथ सोडली, निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतर शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर आपल्याकडे दुसरा प्लॅन तयार असावा, यावर शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं एकमत झालं आहे.
सोडून गेलेल्यांचे बीडमध्ये डिपॉझिट जप्त होणार : बड्या नेत्याचा मुंडेंसह बंडखोर आमदारांना इशारा
यामुळे या दोन्ही पक्षांकडून ‘प्लॅन बी’ आखणीला सुरुवात केली आहे. शरद पवार यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला फटका बसत असल्याने दोन्ही पक्ष सावध झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत राष्ट्रवादीशिवाय निवडणूक लढण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. राज्य काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याच्या मतानुसार, पवारांच्या नेतृत्वाखालील गटाने भाजपशी युती केल्यास आगामी निवडणुकांचा आराखडा तयार करावा, असा एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे, अशी बातमी काल एका वृत्तपत्राने दिली होती. त्यावर शरद पवार यांनी आज प्रतिक्रिया दिली.