Download App

Pune accident : ‘मारो मत तुमको कितना पैसा चाहीये बोलो’ साक्षीदाराने सांगितला घटनाक्रम

रविवारी पुण्यात झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. त्यातील साक्षिदारांनी काही महत्वाचे खुलासे केले आहेत.

Pune accident case : कल्याणीनगर अपघात प्रकरणात (Porsche car) मध्ये विशाल अगरवाल यांच्या मुलासोबत इतर दोन मुलं होती. घटनेनंतर एक मुलगा पळून गेला, तर दुसऱ्याला लोकांनी आरोपी सोबत जागेवरच पकडलं. या मुलांची नावंही एफआयआरमध्ये नमूद नाहीत. ती का नमूद करण्यात आली नाहीत? असा प्रश्न विचारला जात आहे. या घटनेतील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराशी माध्यमांनी संपर्क साधला असता त्याने काही खुलासे केले आहेत.

 

Pune Accident: पुणे अपघातप्रकरणी संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल; म्हणाले, भ्रष्ट पोलीस यंत्रणा आणि…

कितना पैसा चाहीये

कारमध्ये अल्पवयीन आरोपीसोबत शेजारी एक काळ्या रंगाचा टीशर्ट घातलेला मुलगा होता. अपघात झाल्यानंतर तिथे जमलेल्या लोकांनी विशाल अगरवाल यांचा मुलगा आणि त्याच्या शेजारी बसलेला ब्लॅक टीशर्ट वाला मित्र या दोघांना बाहेर ओढून चोप दिला. त्याचवेळी अगरवाल यांचा मुलगा “मारो मत तुमको कितना पैसा चाहीये बोलो” असं ओरडत असल्याचं या साक्षीदारानं सांगितलं आहे.

 

पुणे पोलिसांच्या पाच चुका;पोर्श अपघात अन् दोन निष्पापांचा बळी प्रकरण शेकलं!

यांची चौकशी नाही

चॉईश रेस्टॉंरंट (Coise restaurant) मधील पार्टीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये वेदांतसोबत एक ब्लॅक टीशर्ट घातलेला मुलगा दिसून येत आहे. या साक्षीदाराने त्याला ओळखलं आणि हाच मुलगा गाडीमध्ये पुढं बसला होता, असंही याने सांगितलं आहे. अगरवाल यांच्या मुलासोबत शहरातील अनेक बड्या उद्योजकांची मुलं पार्टीमध्ये होती. परंतु, आरोपीसोबत गाडीमध्ये बसलेल्या मुलांना या गुन्ह्यात आरोपी का करण्यात आलं नाही? त्यांच्या बाबतीत गोपनीयता का पाळली जात आहे? त्यांचीही चकशी होण आवश्यक आहे असंही तो म्हणाला.

 

आमच्यावर दबाव नाही! दुर्दैवाने कोर्टाने दोन अर्ज फेटाळले; पुणे अपघातावर आयुक्तांची प्रतिक्रिया

राज्यभरातून संताप

पुण्यातील कल्याणी नगर जंक्शन भागात रविवारी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श कारने मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आता पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीच्या वडिसांसह बार मालक आणि मॅनेजरला अटक केली आहे. मात्र, आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

follow us