Download App

ज्येष्ठ लेखिका आणि लघुपट निर्मात्या डॉ. अंजली कीर्तने काळाच्या पडद्याआड

  • Written By: Last Updated:

Anjali Keertane passed away : ज्येष्ठ संशोधिका आणि लेखिका डॉ. अंजली कीर्तने (Anjali Keertane) यांचे काल (शनिवार दि. १६ डिसेंबर) रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे एक साक्षेपी लेखिका आणि लघुपट निर्माती काळाच्या पडद्याआड गेली आहे.

‘आरोप करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार’; अंधारेंनी पिक्चर दाखवताच महाजनांची रिअ‍ॅक्शन 

ध्यासपूर्वक अभ्यास करून दिग्गज व्यक्तिमत्त्वांचे कार्य आणि कर्तृत्व शब्दबद्ध करणाऱ्या चरित्रकार म्हणून डॉ. अंजली कीर्तने यांची ओळख होती. कीर्तने मुळच्या मुंबईच्या असून कॉलेजमध्ये असतांनाच त्यांनी मराठीत गद्य लेखनाला सुरूवात केली होती. त्यांना लेखनाचा वारसा आपल्या मातोश्री मराठीतील सुप्रसिद्ध लेखिका पद्मिनी बिनीवाले यांच्याकडून लाभला होता. भरतनाट्यम, सतार वादन याचे शास्त्रशुध्द शिक्षण त्यांनी घेतले होते. मराठी विषयात बी. ए. करताना त्यांनी मुंबई विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला होता. पुढं विख्यात फ्रेंच नाटककार ‘मोलियर यांचा मराठी नाटकांवरील प्रभाव ‘ या विषयावर संशोधन करून त्यांनी पीएच. डी मिळवली होती. पॉप्युलर प्रकाशन संस्थेत त्यांनी संपादक म्हणूनही काम केलं होतं.

लिबियातून युरोपात जाणारे जहाज बुडाले, 61 प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश 

डॉ. अंजली कीर्तने यांनी लिहिलेली चरित्रे त्यांच्या सखोल संशोधनाची आणि लालित्यपूर्ण लेखन कौशल्याची खात्री देतात. हे लेखन करत असतानाच या व्यक्तिमत्त्वांवर लघु चरित्रपट व्हायला हवेत, या विचाराने त्या झपाटल्या आणि मग फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये रितसर प्रशिक्षण घेऊन डॉ. आनंदीबाई जोशी यांच्यावर लघुपट तयार केला. या लघुपटाला १९९२-९३ सालाचा महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला. तसेच दुर्गा भागवत आणि पं. पलुसकर यांच्यावरही लघुपट केले.’दीपावली’ आणि ‘ललित’मधून सातत्याने त्या लिहीत असतं.

याबरोबरच ‘पॅशन फ्लॉवर’, ‘माझ्या मनाची रोजनिशी’, ‘ कॅलिडोस्कोप ‘, ‘हिरवी गाणी’, ‘मनस्विनी प्रवासिनी’ ही पुस्तके लिहून त्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घालती. ‘सोयरीक घराशी’, षड्ज एकांताचा’, ‘आठवणींचा पायरव’ ही त्यांची अलीकडेच प्रकाशित झालेली पुस्तक आहे. राज्य शासनाच्या आणि अन्य संस्थांच्या विविध पुरस्काराने डॉ. अंजली कीर्तने यांच्या लेखनाचा गौरव झाला आहे.

Tags

follow us