‘आरोप करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार’; अंधारेंनी पिक्चर दाखवताच महाजनांची रिअ‍ॅक्शन

‘आरोप करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार’; अंधारेंनी पिक्चर दाखवताच महाजनांची रिअ‍ॅक्शन

Girish Mahajan Vs Sushma Andhare : माझ्यावर आरोप करणाऱ्यांवर मी हक्कभंग आणणार असल्याची रिअ‍ॅक्शन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांच्यावर आरोप केल्यानंतर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी गिरीश महाजनांवर गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांना उत्तर देताना मंत्री गिरीश महाजन यांनी हक्कभंग आणणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Animal Movie Marathi Seen : आधी नकार नंतर होकार, उपेंद्रनं असा साकारला ‘अ‍ॅनिमल’चा ‘फ्रॅडी’ !

गिरीश महाजन म्हणाले, नाशिकचे सर्व मौलाना विवाह सोहळ्यात उपस्थित होते. सर्वांनी आम्हाला आग्रहाचे आमंत्रण दिलेलं होतं. या विवाह सोहळ्यात समोरचे लोकं जे आक्षेपार्ह होते ते आम्हाला माहीत नाही. ज्यांनी माझ्यावर आरोप केला त्यांच्यावर मी हक्क भंग आणणार असल्याचं महाजन म्हणाले आहेत.

तसेच कोण सलीम कुत्ता हे मला माहित नाही. मात्र, त्या पार्टीमध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी बडगुजर हे डान्स करताना दिसत आहेत. त्याबद्दल चौकशी समिती नियुक्त करण्यात आली असून चौकशी सुरू आहे. चौकशीत जे काय आहे ते समोर येणार असल्याचंही गिरीश महाजन म्हणाले आहेत.

‘उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली नसती तर अजितदादांनाही सोबत घेतलं नसतं’; तावडेंचा खळबळजनक दावा

सुषमा अंधारेंनी काय आरोप केले?
सलिम कुत्ताच्या पार्टीत गिरीश महाजनही होते, कारण भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दोन वर्षांपूर्वींचे फोटो दाखवले आहेत पण आख्खा पिक्चर मी दाखवायला तयार आहे. नितेश राणेनी जे फोटो झळकावले त्यात आमचे पदाधिकारी दोषी असतील तर नक्की कारवाई व्हावी पण या व्हिडिओमध्ये सालिम कुत्तासोबत गिरीश महाजन, विक्रांत चांदवडकर, बाळासाहेब सानप हे एकाच फ्रेममध्ये दिसत असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

धारावी अदानीच्या घशात घालाल तर चेचून-ठेचून काढू; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना इशारा

दरम्यान, भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचे गॅंगस्टर सलिम कुत्तासोबत फोटो दाखवले आहे. नितेश राणेंनी भर हिवाळी अधिवेशनात हे फोटो दाखवल्याने एकच खळबळ उडाली. या फोटोच्या मुद्द्यावरुन आता विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरलं होतं. त्यानंतर आता मंत्री गिरीश महाजनांनी आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे.

हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचे गॅंगस्टर सलिम कुत्ता याच्यासोबतचे फोटो दाखवले होते. त्यावरुन चांगलच वादंग पेटलं आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असून आता चौकशी नेमकं काय समोर येणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube