धारावी अदानीच्या घशात घालाल तर चेचून-ठेचून काढू; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना इशारा
Uddhav Thackeray on BJP : मुंबईतील धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे काम अदानी समूहाला देण्यात आलं. मात्र, हे काम देतांना यात टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली अदानीच्या बीकेसीतील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी संबोधित करताना ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) जोरदार टीका केली. पन्नास खोके कमी पडालया लागले, त्यामुळं धारावी गिळायला निघालेत. पण, सब भूमी अदानीची कदापी होऊ देणार नाही, असं ठाकरे म्हणाले.
राम शिंदेंपाठोपाठ अजितदादांचे आमदार जगतापांना आश्वासनांचे पाठबळ
उद्धव ठाकरे म्हणाले की, आज धारावीत फक्त कार्यकर्ते आले, गरज पडली तर महाराष्ट्र धारावीत उतरवेन पण. धारावीकरांवर अन्याय होऊ देणार नाही… या सरकारला पन्नास खोके कमी पडतात. हे असंविधानिक सरकार आहे. यांना वाटत आपल्याला कुणी जाब विचारू शकत नाही. प्रश्न अदानीला विचारला तर भाजप उत्तर देते. हे शासन तुमच्या दारी नाही, तर सरकार अदानीच्या दारी आहे. मात्र, दलालांनो, तुम्ही दलाली करून धारावी अदानीच्या घशात घालाल तर तुम्हाला चेचून-ठेचून काढू, असा इशारा ठाकरेंनी दिला.
मराठा आरक्षणाविरोधात पवारांचं एकतरी वक्तव्य दाखवा; फडणवीसांच्या टीकेला आव्हाडांचं प्रत्युत्तर
ठाकरे म्हणाले, मी जोपर्यंत सत्तेत आहे, तोपर्यंत त्यांना मुंबई गिळंकृत करता येणार नाही, हे त्यांना कळलं. म्हणूनच त्यांनी हे सरकार पाडले. अडीच वर्षे यशस्वीपणे चालवलेले सरकार गद्दारांनी पाडलं. त्यांना खोके कुणी पुरवले? फ्लाइट आणि हॉटेल्स कोणी बुक केले? हे आज तुमच्या लक्षात आलं असेल, असं म्हणत ठाकरेंनी अदानींवर निशाणा साधला.
पाप केलं असेल तर फडणवीसांचं
भाजप म्हणते, ठाकरे बिल्डरांच्या बाजूने आहेत. परंतु तुम्ही अदानींचे बुट का चाटताय? ठाकरेंचं सरकार बिल्डरधार्जिने असल्याचे आरोप होतात. पण माझा उद्योग धार्जिणा एकतरी निर्णय असा दावखा. 2018-19 मध्ये धारावीबाबत जीआर जारी काढला. तेव्हा आमचं सरकार नव्हतं. तर त्यांचंच सरकार होतं. त्यामुळे याबाबत कोणी पाप केलं असेल तर देवेंद्र फडणवीसांसाचं आहे, अशा शब्दात ठाकरेंनी हल्लाबोल केला.
धारावीसोबतच देवनार आणि अभ्युदय नगरही भाजप अदानींच्या घशात घालायला निघाले आहेत. देवनारची 350 एकर जमीन बळकावण्याचा त्यांचा डाव आहे. मात्र, सब भूमी गोपाल की, तसं सब भूमी अदानी की होऊ देणार नाही… तसं झालं तर पापडासारखं वाळवत घालू, असं ठाकरे म्हणाले.