मराठा आरक्षणाविरोधात पवारांचं एकतरी वक्तव्य दाखवा; फडणवीसांच्या टीकेला आव्हाडांचं प्रत्युत्तर

  • Written By: Published:
मराठा आरक्षणाविरोधात पवारांचं एकतरी वक्तव्य दाखवा; फडणवीसांच्या टीकेला आव्हाडांचं प्रत्युत्तर

Jitendra Awhad : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा तापला आहे. याच मुद्दावरून अनेकदा मनोज जरांगे पाटलांसह विरोधकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीका केली होती. तर आता फडणवीसांनी शरद पवारांवर टीकास्त्र डागलं. मराठा समाजाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांनीच (Sharad Pawar) केल्याचं विधान फडणवीसांनी केलं. फडणवीसांनी केलेल्या टीकेला आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी जोरदार पलटवार केला.

धारावी प्रकल्पात घोटाळा झाला असेल तर ते पाप उद्धव ठाकरेंचं; आशिष शेलारांची टीका 

आज माध्यमांशी बोलतांना आव्हाड म्हणाले की मराठा सामजाला आरक्षण देतो, असं सांगून झुरत ठेवण्याचं काम शिंदे सरकार करत आहे. आता विनाकारण शरद पवार यांच्यावर खापर फोडले जात आहे. शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केल्याचं एकतरी वक्तव्य फडणवीसांनी दाखवावं. आपण अयशस्वी होतोय, असं वाटतं असतांना दुसऱ्यांच्या डोक्यावर नारळ फोडणं ही त्यांची जुनीच पद्धत आहे, अस आव्हाड म्हणाले.

प्रसिद्धी मिळाल्यानं जरांगेंच्या डोक्यात हवा, भुजबळांना मारण्याची धमकी; समीर भुजबळांचा गंभीर आरोप 

ते म्हणाले की, तुम्ही धनगर समाजाला आरक्षण देणार होते, ते देखील मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत. मात्र, देऊ शकले नाही. लिंगायत समाजालाही आरक्षण देऊ शकले नाही. तुम्ही दिलेली सर्व आश्वासने फेल झाली आहेत.मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावून 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण देऊ असं सांगितलं होतं. आता तारीख जवळ येत आहे, मात्र तोडगा निघत नाही. त्यामुळं आता आरक्षणाच्या कात्रीत सापडलेलं शिंदे सरकार आणि उपमुख्यमंत्री शरद पवारांचे नाव घेत आहे. मात्र, लोकांना माहित आहे, शरद पवार यांचा काहीही संबंध नाही.

तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर तुमच्या मंत्रिमंडळाने प्रधानमंत्र्यांकडे जाऊन त्याबद्दल चर्चा केली पाहिजे, असंही आव्हाड म्हणाले.

फडणवीसांची टीका काय?
मराठा आरक्षणाला शरद पवारांनी सर्वात मोठा विरोध केला. पवारांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नव्हते. स्वत:च्या नेतेपदासाठी शरद पवारांनी समालाजला झुंझवत ठेवलं. पवारांच्या मनात असते तर त्यांनी मंडल आयोगाच्या वेळीच मराठा समाजाला आरक्षण दिले असते. मात्र, त्यांना कधीही मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नव्हते. त्यांना फक्त दोन समाजाला झुंझवत ठेवायचं होतं, असं फडणवीस म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube