Nirmala Nawale : सोशल मीडियावर लाखोंची पसंती, पण निवडणुकीत नाकारलं…

सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवार निर्मला नवले यांचा कारेगाव पंचायत समिती गणातून 2700 मतांनी पराभव झाला आहे.

Nirmala Navale

Nirmala Navale

zila Parishad election 2026 : राज्यातील 12 जिल्ह्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल हात येत आहेत. अशातच पुण्यातील शिरुरमधील कारेगाव गणातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमदेवार निर्मला नवले यांचा 2700 मतांनी पराभव झालायं. भाजपच्या मनिषा पाचंगे कारेगाव गणातून विजयी झाल्या आहेत. त्यामुळे आता सोशलवर लाखोंनी फॉलोवर्स असलेल्या नवलेंचा 2700 मतांनी झाल्याचीच चर्चा होत आहे.

12 जिल्हे, 125 पंचायत समित्या आणि एकचं प्रश्न, सत्ता कोणाची, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

काही दिवसांपूर्वीच नवले यांचा एका व्हिडिओ समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल झाला होता. रेंज रोव्हर कार घेण्याचं त्यांचं स्वप्न होतं. अखेर पतीने ही कार मिळवून दिली. नवऱ्याने दिलेली रेंज रोव्हर कार पाहून माजी सरपंच निर्मला नवले अगदी लहान मुलासारख्याच उड्या मारत आनंदित झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

उद्धव ठाकरे संख्याबळाच्या कोंडीत; विधान परिषदेचा मार्ग राज्यसभा निवडणुकीवर अवलंबून

निर्मला नवले या माजी सरपंच असून सोशल मीडियावर त्यांचे असंख्य फॉलोवर्स आहे. एक आयटी इंजिनिअर असलेल्या निर्मला नवले सरपंच झाल्यानंतर त्यांचे कौतूक केले जात होते. त्या एक उच्चशिक्षित माजी सरपंच ठरल्या होत्या. त्यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आणि त्या जिंकूनही आल्या होत्या. मात्र, पंचायत समिती निवडणुकीत त्यांचा पराभव झालायं.

भारतात चार प्रकारचे हिंदू आहेत; काय म्हणाले सरसंघचालक डॉ. मोहन भागवत?

कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले या कायमच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. निर्मला नवले या राजकारणी असल्या तरी इन्स्टाग्रामवर त्यांचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. निर्मला नवले यांनी आयटी इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केले आहे. काही वर्षांपूर्वी निर्मला नवले यांची कारेगावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. तेव्हापासून त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढत गेली. उच्चशिक्षित आणि लोकप्रिय चेहरा म्हणून निर्मला नवले या कायम चर्चेत असायच्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीत निर्मला नवले यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय.

सरपंच पद रद्द झालं होतं..
सरकारी जागेवर अतिक्रमणाबाबत विरोधकांनी नवले यांचं सरपंच पद रद्द होण्यासाठी केस दाखल केली होती. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी नवले यांच्याविरोधात निकाल दिला होता. त्यानंतर आयुक्तांकडे मी माझी बाजू मांडली. माझी बाजू ऐकून घेऊन त्यांनी सत्याच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर विरोधकांनी उच्च न्यायालयात अपिल केले. उच्च न्यायालयात माझी बाजू ऐकून घेऊन सत्याच्या बाजूने निकाल दिला.

2021 साली सरपंच झाल्यानंतर लगेचच 7 दिवसांनंतरच विरोधकांकडून ही केस दाखल करण्यात आली होती. गेल्या साडेतीन वर्षांपासून हा लढा सुरु होता. न्यायव्यवस्थेवर विश्वास म्हणून नवलेंनी लढा सुरुच ठेवला. अखेर उच्च न्यायालयातही त्यांच्या बाजून निकाल लागला होता.

Exit mobile version