इंदापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र अन् घड्याळ चिन्ह फिक्स, अंकिता पाटील दाखल करणार उमेदवारी अर्ज

Ankita Patil : नुकतंच 29 महापालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने अनेक ठिकाणी बाजी मारली आहे. तर आता राज्यात जिल्हा परिषद आणि नगर

Ankita Patil

Ankita Patil

Ankita Patil : नुकतंच 29 महापालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने अनेक ठिकाणी बाजी मारली आहे. तर आता राज्यात जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीसाठी निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली आहे. या निवणुकीसाठी ज्या ठिकाणी शक्य असेल घडाळ्यावर आणि ज्या ठिकाणी शक्य असेल तुतारी चिन्हावर निवडणुकी लढवणार असल्याची घोषणा अजित पवार यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यानुसारच आता इंदापुरातसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयानुसार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCPSP) नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची कन्या अंकिता पाटील (Ankita Patil) घड्याळ चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. अंकिता पाटील आज घड्याळाच्या चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील बावडा जिल्हा परिषद गटामधून अंकिता पाटील निवडणूक लढवणार आहे.

तर दुसरीकडे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा मुलगा श्रीराज भरणे देखील इंदापूर पंचायत समिती निवडणूक लढवणार आहे. श्रीराज दत्तात्रय भरणे हे बुधवारी बोरी पंचायत समिती गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

सोयीनुसार चिन्हांचा वापर

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी (Zilla Parishad and Panchayat Samiti Elections) दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एकत्र आल्याने दोन्ही पक्ष चिन्हांचा वापर सोयीनुसार करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी घड्याळ फायदेशीर ठरले त्या ठिकाणी घड्याळवर उमेदवार उतरवणार आणि ज्या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस फायदेशीर ठरेल त्याठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा चिन्ह वापरण्याचा निर्णय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

विधानसभा अन् आता महापालिका निवडणूक, सरवणकर फॅमिलीच्या पराभवामागे भाजपचा हात?

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी देखील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत युतीची घोषणा केली होती मात्र या निवडणुकीत फारसा फायदा झाला नाही. अनेक ठिकाणी या युतीतील उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

Exit mobile version