Download App

दहशतवाद्यांना पैसे पुरवणारा झुल्फिकार बडोदावाला 11 ऑगस्टपर्यंत ATS कोठडीत

  • Written By: Last Updated:

पुणे : काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांना (Pune Police) रात्री गस्तीवर असताना मोस्ट वॉन्टेड दहशतवादी (Most Wanted Terrorist) हाती लागले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असून हे दहशतवादी आता दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात आहे. दरम्यान, त्यानंतर झुल्फिकार बडोदावाला (Zulfikar Barodawala) यालाही अटक करण्यात आली असून तो दहशतवाद्यांनी पैसे पुरवत असल्याचं तपासात निष्पन्न झालं. (Zulfiqar Badodawala remanded to ATS custody till August 11)

पुणे आणि परिसरातील सुनसान जागी स्पोट करण्यासाठी बॉम्बस्फोट करण्याची प्रॅक्टीस करणाऱ्या दोन दहशतवाद्यांनी पुणे पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी अटक केलेल्या या दहशतवाद्यांच्या चौकशीतून दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आणखी तिघांना दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. अटकेत असलेल्या या दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव झुल्फिकार बडोदावाला असून हा दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवत होता. तसेच, त्याचा संबंध पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही दहशतवाद्यांशी असल्याचेही राज्य दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या तपासातून उघड झाले आहे.

बिलाला विरोध केला तरीही ‘आप’ तुम्हाला.., केंद्रीय मंत्री अमित शाहांचा काँग्रेसला सल्ला 

झुल्फिकारने महंमद इमरान मोहम्मद युसुफ खान आणि महंमद युसुफ मोहम्मद याकूब साकी या दोघांनाही दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवले आहेत. शिवाय या दोघांशी वेळोवेळी फोनवरून संपर्क साधल्याचेही तपासात समोर आले आहे.

एटीएसने दहशतवाद्यांना पैसे पाठवणाऱ्या निसाब नसरुद्दीन काझी याला नुकतीच अटक केली असून त्यापाठोपाठ आता झुल्फिकारवर देखील अटकेची कारवाई केली आहे.

झुल्फिकार याला बुधवारी (ता. 2 ऑगस्ट) न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्याने आतापर्यंत किती रक्कम दहशतवाद्यांना दिली? तसेच, त्याला यामध्ये आणखी कुणी मदत केली का? याच्या सखोल तपासासाठी एटीएस कोठडीची मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली होती. त्यानुसार त्याला 11 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, आतापर्यंत अटक करण्यात आलेले दहशतवादी मोठा घातपात करण्याच्या तयारीत होते, असे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालं असून त्यांच्या रडारवर पुणे शहर होते. इतकच नाही तर या दहशतवाद्यांनी पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी देखील घेतली होती. दहशतवाद विरोधी पथकाने या दहशतवाद्यांकडून काही महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास राज्य दहशतवाद विरोधी पथक करत आहे.

Tags

follow us