Download App

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची T20 मालिका; जाणून घ्या प्लेईंग-11, टाईमटेबल ते लाईव्ह स्ट्रिमिंग

IND vs AUS T20: विश्वचषक संपल्यानंतरही क्रिकेटचा ज्वर संपणार नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS T20) यांच्यात 23 नोव्हेंबरपासून 5 सामन्यांची T20 मालिका खेळवली जाणार आहे. तर मालिकेतील शेवटचा सामना 3 डिसेंबर रोजी होणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ (Australian squad) जाहीर करण्यात आला आहे. भारताचा संघ (Indian squad) अद्याप जाहीर झालेला नाही. मॅथ्यू वेडकडे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

बीसीसीआय लवकरच भारतीय संघाची घोषणा करू शकते. ऋुतुराज गायकवाड किंवा सूर्यकुमार यादव यांच्याकडे टीम इंडियाची धुरा दिली जाऊ शकते. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह संघातील अनेक वरिष्ठ खेळाडू विश्रांती दिली जाऊ शकते. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध युवा खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.

भारतीय संघात यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, टिलक वर्मा आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या रायन पराग या फलंदाजांना संधी मिळू शकते. तर संजू सॅमसन यष्टिरक्षक म्हणून परत येऊ शकतो आणि जितेश शर्माचा बॅकअप यष्टीरक्षक म्हणून संघात समावेश होऊ शकतो. गोलंदाजीत मुकेश कुमार, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई या गोलंदाजांचा समावेश होऊ शकतो.

मोहम्मद शमीने मारली पंतप्रधान मोदींना मिठी, फायनल हारल्याने अश्रू अनावर

तुम्ही थेट कुठे पाहू शकता?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेचे स्पोर्ट्स 18 नेटवर्कद्वारे टीव्हीवर थेट प्रक्षेपण केले जाईल. या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioCinema अॅपवर केले जाणार आहे.

वेळापत्रक असे आहे
– पहिला सामना- 23 नोव्हेंबर, राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम
– दुसरा सामना- 26 नोव्हेंबर, ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम
– तिसरा सामना- 28 नोव्हेंबर, बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
– चौथा सामना- 1 डिसेंबर, विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
– पाचवा सामना- 03 डिसेंबर, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद

World Cup Final : ट्रेविस हेडने दाखवून दिलं, ‘जख्मी शेर ज्यादा खतरनाक होता है’!

T20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
मॅथ्यू वेड (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, टीम डेव्हिड, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, जोश इंग्लिस, तन्वीर संघा, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, स्पेन्सर जॉन्सन, अॅडम झाम्पा.

भारताचा संभाव्य संघ
सूर्यकुमार यादव, ऋुतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवी बिश्नोई, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, टिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, रिंकू सिंग, रियान पराग, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार.

Tags

follow us