World Cup 2023 : वानखेडे स्टेडियमवर अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानकडून इब्राहिम झद्रानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक झळकावले आहे. इब्राहिम झद्रानने 131 चेंडूत शतकाचा टप्पा गाठला. अशा प्रकारे इब्राहिम झद्रानने इतिहास रचला आहे. तो अफगाणिस्तानकडून विश्वचषकात शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
इब्राहिम झद्रानने नाबाद 129 धावा केल्या. यात त्याने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकार मारले. आतापर्यंत अफगाणिस्तानच्या एकाही फलंदाजाला विश्वचषकात शतक झळकावण्यात यश आले नव्हते.
बांग्लादेशला मोठा धक्का, शाकीब अल हसन विश्वचषकातून बाहेर
इब्राहिमचे वनडे कारकिर्दीतील पाचवे शतक
त्याचबरोबर इब्राहिम झद्रानचे वनडे कारकिर्दीतील हे पाचवे शतक आहे. इब्राहिम झद्रानने 27 एकदिवसीय सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व केले असून 52.08 च्या सरासरीने 1250 धावा केल्या आहेत. 5 शतके झळकावण्याव्यतिरिक्त इब्राहिमने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत 5 वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे.
World Cup 2023 : 6 मिनिटांच्या उशीरानंतरही गांगुली वाचला; 16 वर्षांपूर्वी काय घडलं?
अफगाणिस्तानने दिले 292 धावांचे लक्ष्य
प्रथम खेळताना अफगाणिस्तानने 50 षटकांत 5 बाद 291 धावा केल्या. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियासमोर आता 292 धावांचे आव्हान आहे. अफगाणिस्तानने शेवटच्या 5 षटकात 62 धावा केल्या. इब्राहिम झद्रानने 8 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 129 आणि राशिद खानने 18 चेंडूत 35 धावा केल्या. रशीदने 2 चौकार आणि 3 षटकार मारले. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने दोन विकेट घेतल्या. अॅडम झाम्पा आणि मिचेल स्टार्क यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.