AFG vs WI : पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या टी20 विश्वचषकाच्या तयारीसाठी सुरु असलेल्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान अफगाणिस्ताने वेस्ट इंडिजचा दारुण पराभव केला आहे. युएई येथे सुरु असणाऱ्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने विजय मिळवला आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचा 38 धावांनी पराभव करत अफगाणिस्ताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात (AFG vs WI) अफगाणिस्तानचा (Afghanistan) कर्णधार रशीद खानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय चुकीचा ठरला, कारण रहमानउल्लाह गुरबाज पहिल्याच चेंडूवर बाद झाला. 19 धावांनी दुसरी विकेट गमावल्यानंतरही अफगाणिस्तानने शानदार फलंदाजी केली. इब्राहिम झद्रान आणि दरविश रसूलीने तिसऱ्या विकेटसाठी 170 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. इब्राहिम झद्रानने 56 चेंडूत 87 धावा केल्या, तर रसूलीने 59 चेंडूत 84 धावा केल्या. या कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्ताने 20 षटकात 3 बाद 181 धावा केल्या.
182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, वेस्ट इंडिज (West Indies) संघ 20 षटकात 9 विकेट गमावून केवळ 143 धावा करू शकला आणि सामना 38 धावांनी गमावला. वेस्ट इंडिजच्या चार फलंदाजांनी 25 किंवा त्याहून अधिक धावा केल्या, परंतु सामना जिंकू शकले नाहीत. अफगाणिस्तानकडून झिया उर रहमान शरीफीने 3 विकेट घेतले, तर मुजीब उर रहमान, रशीद खान (Rashid Khan) आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतले.
मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर प्रेमकथेचा नवा अध्याय “सहवास” ; पहिले पोस्टर प्रदर्शित
वेस्ट इंडिजकडून क्वेंटिन सॅम्पसनने 24 चेंडूत 30 धावा, गुडाकेश मोतीने 15 चेंडूत 28 धावा, जॉन्सन चार्ल्सने 16 चेंडूत 27 धावा आणि मॅथ्यू फोर्डने 21 चेंडूत 25 धावा केल्या. तर दुसरीकडे आतापर्यंत वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांच्यात नऊ टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी वेस्ट इंडिजने पाच जिंकले आहेत, तर अफगाणिस्तानने चार वेळा विजय मिळवला आहे.
