Indian Cricket Team Schedule : भारतीय संघ कसोटी मालिका कधी खेळणार? अफगाणिस्ताननंतर ‘या’ संघाशी भिडणार टीम इंडिया 

Indian Cricket Team Schedule : अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय संघाने शानदार खेळ करत अफगाणिस्तानचा

Indian Cricket Team Schedule

Indian Cricket Team Schedule

Indian Cricket Team Schedule : अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय संघाने शानदार खेळ करत अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी पराभव केला आहे. न्यू चंदिगड मैदानात झालेल्या या सामन्यात भारतीय संघाकडून मानव सुथारने 7 विकेट्स घेत विजयामध्ये महत्वाची भूमिका बजावली. या कसोटी सामन्यानंतर आता भारतीय संघ एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटमध्ये व्यस्त होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात भारतीय संघ कसोटी मालिका कधी खेळणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

सध्या बीसीसीआयकडून (BCCI) देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) स्पर्धेत श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) कसोटी मालिका खेळणार आहे.

ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या मालिकेची सुरुवात 15 ऑगस्टपासून होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर श्रीलंकेच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ दोन कसोटी सामन्यांची मालिकेसाठी न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्याची सुरुवात नोव्हेंबर 2026 पासून होणार आहे. 19 ते 23 नोव्हेंबर पहिला कसोटी सामना तर 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दुसरा कसोटी सामना भारतीय संघ खेळणार आहे.

न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारतीय संघ मायदेशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची गावस्कर – बॉर्डर ट्रॉफी खेळणार आहे. या मालिकेची सुरुवात 21 जानेवारीपासून होणार आहे. या मालिकेत पहिला कसोटी सामना 21 ते 25 जानेवारी, दुसरा सामना 29 ते 2 फेब्रुवारी, तिसरा सामना 11 ते 15 फेब्रुवारी, चौथा सामना 19 ते 23 फेब्रुवारी आणि पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 27 ते 3 मार्चपर्यंत खेळला जाणार आहे.

टीम इंडियाचे आगामी कसोटी वेळापत्रक

भारताचा श्रीलंका दौरा (ऑगस्ट 2026 )

पहिली कसोटी: 15 ऑगस्टपासून (संभाव्य तारीख), श्रीलंका

दुसरी कसोटी: ऑगस्टच्या उत्तरार्धात, श्रीलंका

भारताचा न्यूझीलंड दौरा (नोव्हेंबर-डिसेंबर 2026 )

पहिली कसोटी: 19-23 नोव्हेंबर 2026, बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन

दुसरी कसोटी: 27 नोव्हेंबर – 1 डिसेंबर 2026 , हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा (बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2027 )

पहिली कसोटी: 21-25 जानेवारी 2027, व्हीसीए (VCA) स्टेडियम, नागपूर

दुसरी कसोटी: 29 जानेवारी – 2 फेब्रुवारी 2027, एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

तिसरी कसोटी: 11-15 फेब्रुवारी 2027, एसीए (ACA) स्टेडियम, गुवाहाटी

चौथी कसोटी: 19-23 फेब्रुवारी 2027, जेएससीए (JSCA) आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रांची

पाचवी कसोटी: 27 फेब्रुवारी – 3 मार्च 2027, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

घरफोडी करणारे दोघे संशयित जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेकडून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत-

Exit mobile version