Download App

रोमांचक सामना, इंग्लंडचा विजय पण चर्चा सौरव गांगुलीची…, लॉर्ड्स कसोटीत नेमकं घडलं तरी काय?

Sourav Ganguly : अँडरसन - तेंडुलकर ट्रॉफीच्या (Anderson - Tendulkar Trophy) तिसऱ्या कसोटी सामन्यात लॉर्ड्सच्या मैदानात (Lord Test)

  • Written By: Last Updated:

Sourav Ganguly : अँडरसन – तेंडुलकर ट्रॉफीच्या (Anderson – Tendulkar Trophy) तिसऱ्या कसोटी सामन्यात लॉर्ड्सच्या मैदानात (Lord Test) इंग्लंडने एका रोमांचक (INDvsENG)सामन्यात भारताचा 22 धावांनी पराभव केला आहे. मात्र यानंतर सोशल मीडियावर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) चर्चेत आहे. याचा मुख्य कारण म्हणजे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, 23 वर्षांपूर्वी लॉर्ड्सच्या बाल्कनीत आपला टी-शर्ट हलवणाऱ्या सौरव गांगुलीची आठवण करुन देऊन या सामन्यात इंग्लंडचा संघ विजयी झाला आहे.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना बेन स्टोक्स म्हणाला की, त्याने पाचव्या दिवसाच्या खेळापूर्वी जोफ्रा आर्चरला (Jofra Archer) लॉर्ड्सच्या बाल्कनीत टी-शर्ट हलवण्याची स्टोरी सांगितली होती. या स्टोरीनंतर आर्चरने या सामन्यात मॅच बदलणारा स्पेल टाकला ज्याचा फायदा इंग्लंडला झाला.

स्टोक्स म्हणाला, ‘मी सकाळी आर्चरला सांगितले, ‘तुम्हाला माहिती आहे का आज कोणता दिवस आहे? भारताने या दिवशी 300 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग केला आणि गांगुलीने त्याचा टी- शर्ट हलवला. आर्चरला वाटले की हा विश्वचषक फायनल आहे, जो सहा वर्षांपूर्वी घडला होता. पण आर्चरला 6 वर्षांपूर्वी 2019 मध्ये झालेल्या वर्ल्ड कप फायनलची आठवण झाली, ज्यामध्ये इंग्लंडने 14 जुलै रोजी न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला होता. त्यानंतर आर्चरने जबरदस्त गोलंदाजी केली आणि ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या विकेट घेतल्या.

खासगी शाळेत मध्यवर्गीयांची लुटमार, चार्टर्ड अकाउंटंट मीनल गोयलांचा धक्कादायक दावा

जोफ्रा आर्चर चार वर्षांनी कसोटी सामना खेळत होता आणि तो परत येताच या खेळाडूने आपली क्षमता सिद्ध केली. आर्चरने लॉर्ड्स कसोटीत पाच विकेट घेतल्या. पहिल्या डावात त्याने जयस्वाल आणि सुंदरला बाद केले. दुसऱ्या डावात त्याने पुन्हा एकदा जयस्वाल आणि सुंदर यांच्या विकेट घेतल्या आणि ऋषभ पंतला बाद करून इंग्लंडचा विजय निश्चित केला. बेन स्टोक्स सामन्यात पाच विकेट घेतल्या आणि 77 धावांचे योगदान दिले. इतकेच नाही तर त्याने पहिल्या डावात पंतला धावबाद केले ज्यामुळे या सामन्याची दिशा बदलली.

follow us