BCCI 125 Crore Prize : भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बीसीसीआयने संघावर पैशांचा वर्षाव करत 125 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. या बक्षीसाचे वाटणी करण्यात आली असून, खेळाडूंपासून ते सिलेक्टरपर्यंत कोणाला किती पैसे मिळणार हे जाणून घेऊया.
कशी होणार वाटणी
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार बक्षिसाची रक्कम 15 सदस्यीय संघातील सदस्यांना प्रत्येकी 5 कोटी दिले जाणार आहे. तर, चार राखीव खेळाडू असलेल्या रिंकू सिंग, शुभमन गिल आवेश खान आणि खलील अहमद यांना प्रत्येकी एक कोटी रुपये दिले जाणार आहेत.
एकही मॅच न खेळता मिळणार 5 कोटी
भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला प्रत्येक 5 कोटी दिले जाणार आहेत. यात एकही सामना न खेळता संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल आणि युजवेंद्र चहल हे कोट्यवधी रूपयांचे मानकरी ठरले आहेत.
राहुल द्रविडसह अन्य स्टाफला किती रक्कम?
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप, गोलंदाज प्रशिक्षक पारस महांबरे यांना प्रत्येकी 2.5 कोटी रुपये दिले जाणार आहेत.
निवड समितीच्या सदस्यांनाही मिळणार बक्षीस
खेळाडूंशिवाय निवड समितीतील सदस्यांवरही बक्षीसाचा वर्षाव केला जाणार आहे. यात अजित आगरकरसह निवड समितीच्या प्रत्येक सदस्याला प्रत्येकी एक कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर, तीन फिजियोथेरेपिस्ट, तीन थ्रोडाउन विशेषज्ज्ञ, मालिश करणारे आणि स्ट्रेंथ आणि कंडीशनिंग कोचला प्रत्येकी दोन कोटींची रक्कम दिली जाणार आहे.