रोहित आणि विराटनंतर ‘हा’ स्टार खेळाडू खेळणार विजय हजारे ट्रॉफी ; BCCI ने केली मोठी घोषणा

Vijay Hazare Trophy 2025 : भारतीय संघाचे स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि विरोट कोहली 2025-26 विजय हजारे ट्रॉफी खेळणार आहे. तर आता

Vijay Hazare Trophy 2025

Vijay Hazare Trophy 2025

Vijay Hazare Trophy 2025 : भारतीय संघाचे स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि विरोट कोहली 2025-26 विजय हजारे ट्रॉफी खेळणार आहे. तर आता बीसीसीआयकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. विराट आणि रोहित शर्मानंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा अष्टपैलू आणि स्टार खेळाडू रवींद्र जडेजा देखील खेळताना दिसणार आहे.

रवींद्र जडेजा खेळणार विजय हजारे ट्रॉफी

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy 2025) सौराष्ट्राकडून खेळणार आहे. क्रिकेट सोराष्ट्राने यााबाबत माहिती दिली आहे. रवींद्र जडेजा 6 आणि 8 जानेवारी रोजी सौराष्ट्राकडून खेळणार असल्याची माहिती सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने दिली आहे. जडेजा या स्पर्धेत दोन सामने खेळणार आहे. जडेजा सर्व्हिसेस आणि गुजरातविरुद्ध खेळणार आहे.

टीम इंडियामध्ये निवड झाली तर योजना बदलणार

जर भारतीय संघात न्यूझीलंडविरुद्ध रवींद्र जडेजाची एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाली तर त्याच्या योजना बदलू शकतात. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिका 11 जानेवारीपासून सुरू होत आहे आणि टीम इंडियाला त्यासाठी लवकर तयारी करावी लागेल. म्हणूनच विराट, रोहित आणि इतर खेळाडू विजय हजारे ट्रॉफीचे पहिले काही सामने खेळत आहेत. सध्या जडेजा दोन व्हीएचटी सामने खेळणार आहे.

Pune Election : पुणे महानगरपालिकेत आंदेकर विरुद्ध कोमकर सामना रंगणार?

तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रवींद्र जडेजाचा समावेश नव्हता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपासून त्याने भारतीय संघात पुनरागमन केला आहे. या मालिकेत खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये त्याने एक विकेट घेतली आणि दोन डावांमध्ये 56 धावा केल्या. जडेजाची कामगिरी विशेष प्रभावी राहिलेली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याचा समावेश होईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version