IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या हंगामात डबल हेडर खेळला जात आहे. पहिल्या सामन्यात गतविजेते गुजरात टायटन्स (GT) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघ आमनेसामने आहेत. कोलकाता येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोसमातील दोन्ही संघांमधील ही दुसरी लढत आहे.
ओल्या मैदानामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला. या मोसमातील कोलकाता आणि गुजरात यांच्यातील ही दुसरी लढत आहे. गेल्या सामन्यात रिंकू सिंगने सलग ५ षटकार ठोकत कोलकाता संघाला विजय मिळवून दिला होता.
सामन्यातील दोन्ही संघांचे प्लेइंग-11
कोलकाता संघ : एन जगदीसन, रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, डेव्हिड वेस, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
गुजरात संघ : ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, जोश लिटल आणि मोहित शर्मा.
Maharashtra APMC Election Result LIVE updates : राज्याच्या कल कोणाकडे? कोण राखणार सत्ता
सलग चार सामने गमावल्यानंतर केकेआरने शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) पराभव करून पुनरागमन केले. अशा परिस्थितीत केकेआर संघ आपली विजयी घोडदौड कायम राखू इच्छितो. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने आपल्या भक्कम गोलंदाजीच्या जोरावर शेवटचे दोन्ही सामने जिंकून आपली मोहीम पुन्हा रुळावर आणण्यात यश मिळवले आहे.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात संघाने आतापर्यंत 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. यासह हा संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आज गुजरात जिंकला तर अव्वल स्थान गाठेल. दुसरीकडे, कोलकाता संघाने आतापर्यंत 8 पैकी 3 सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत हा संघ सध्या ७व्या क्रमांकावर असून आजचा सामना जिंकून प्लेऑफच्या शर्यतीत मजबूत राहण्याची त्यांची इच्छा आहे.