Download App

भारतीय संघात नगरच्या किरण चोरमलेची निवड; 19 वर्षांखालील संघ ऑस्ट्रेलियाला भिडणार

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतात होणाऱ्या अंडर 19 क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Cricket News : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतात होणाऱ्या अंडर 19 क्रिकेट मालिकेसाठी (Cricket News) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेचे वेळापत्रकही (Team India) जाहीर करण्यात आले आहे. भारताच्या अंडर 19 क्रिकेट संघात नगर शहरातील खेळाडू किरण चोरमले याचीही (Ahmednagar) निवड झाली आहे. झहीर खाननंतर अशी कामगिरी करणारा किरण चोरमले हा दुसराच खेळाडू ठरला आहे. शहरातील हुंडेकरी क्रिकेट अकॅडमीचा किरण खेळाडू आहे. याआधीही किरणची भारताच्या विविध संघात निवड झाली होती. किरण फलंदाजी बरोबरच गोलंदाजी सुद्धा करतो.

किरण चोरमलेने ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळी चांगली कामगिरी केली. संघाला उपयुक्त खेळी केली. त्याच्या याच कामगिरीची दखल घेण्यात आली आणि त्याला भारतीय अंडर 19 क्रिकेट संघात संधी मिळाली. या महिन्यात ऑस्ट्रेलियाचा 19 वर्षांखालील (IND vs AUS) संघ भारतात येणार आहे. 21 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान मालिका होणार आहे. चेन्नई (Chennai) आणि पुदुच्चेरी येथे सामने होणार आहेत. भारतीय क्रिकेट संघात निवड होणारा किरण चोरमले हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा साहिल पारख याचीही संघात निवड करण्यात आली आहे.

किरण चोरमले हा नगरमधील हुंडेकरी स्पोर्ट्स अकॅडमीचा खेळाडू आहे. नागरदेवळे येथे ही अकॅडमी आहे. अकॅडमीचे संस्थापक वसीम हुंडेकरी आणि प्रशिक्षक सर्फराज बांगडीवाले यांच्या मार्गदर्शनात किरण क्रिकेटचा सराव करतो. किरणसह अकॅडमीचे आणखीही काही खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत.

U19 World Cup: भारतीयांचे स्वप्न भंगले ! ऑस्ट्रेलिया चौथ्यांदा विश्वविजेता

याआधी किरण महाराष्ट्र संघाचा (Maharashtra) कर्णधार राहिला आहे. महाराष्ट्र संघाने विजय हजारे करंडक जिंकला होता. यामध्ये किरणची कामगिरी उल्लेखनीय राहिली होती. या कामगिरीच्या बळावर त्याची चॅलेंजर ट्रॉफीसाठीही निवड झाली होती. यानंतर त्याला आणखी एक संधी मिळाली आहे. आता या मालिकेत किरण चोरमले कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us