U19 World Cup: भारतीयांचे स्वप्न भंगले ! ऑस्ट्रेलिया चौथ्यांदा विश्वविजेता
India vs Australia U19 World Cup final : आयसीसीच्या 19 वर्षांखालील (U19 World Cup) विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) भारतचा (India) 79 धावांनी पराभव करत विश्वचषक जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 254 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज अपयशी ठरले. भारतीय संघ अवघ्या 174 धावांत गारद झाला आहे. कसोटी चॅम्पियनशीप, एकदिवसीय विश्वचषकानंतर 19 वर्षांखालील विश्चचषकातही ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला पराभूत केले आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींचे स्वप्न भंगले आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यात ऑस्ट्रेलियाने तीन मोठ्या स्पर्धेत भारतीय संघाला पराभूत केले आहे.
BJP RajyaSabha Candidate : भाजपकडून राज्यसभेचे उमेदवार जाहीर, कोणाला मिळाली संधी?
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत सात गड्यांच्या मोबदल्यात 253 धावांपर्यंत मजल मारली. खराब सुरुवात झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ह्युन वेबगेन आणि हॅरी डिक्सन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 78 धावांची भागीदारी केली. परंतु दोघेही अर्धशतके करू शकली नाही. वेबगेन 48 आणि डिक्सन 42 धावांवर बाद झाले. त्यानंतर हरजस सिंगने 55 धावांची खेळी केली आहे. ओलिवर पीक 46 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून राज लिम्बानीने तीन तर नमन तिवारीने दोन गडी बाद केले.
विजयासाठी 254 धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजासमोर टिकाव धरू शकले नाही. सर्वच फलंदाज अपयशी ठरल्याने भारतीय संघ 43. 5 षटकांत 174 धावांत गारद झाला. त्यामुळे हा सामना ऑस्ट्रेलियाने 79 धावांनी जिंकला आहे. प्रत्युत्तरात भारताची सुरुवात खराब झाली. अर्शिन कुलकर्णी तीन धावांवर बाद झाला. तर आदर्श सिंग आणि मुशीर खानने दुसऱ्या गड्यासाठी 37 धावांची भागीदारी केली. मागील सामन्यात विजयाचा हिरो ठरलेला मराठमोळा सचिन धसही या सामन्यात खास काही करू शकला नाही. तो नऊ धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज राफ मॅकमिलनने तीन आणि महिला बियर्डमॅनने तीन गडी बाद करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.
एकनाथ शिंदे, अजित पवार हे भाजपचे कॉन्ट्रॅक्ट लेबर; संजय राऊतांची घणाघाती टीका
ऑस्ट्रेलियाने चौथ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले
ऑस्ट्रेलियाने चौथ्यांदा 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकला आहे. त्यापूर्वी 1988, 2002 आणि 2010 मध्ये विश्वचषक जिंकला आहे. तर तब्बल 14 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाने 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकला आहे. भारताने पाचवेळा विश्वचषक जिंकला आहे. 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये भारताने विश्वचषक जिंकला आहे. पाकिस्तान संघाने 2004 आणि 2006 मध्ये विश्वचषक जिंकला आहे.