IND Vs ENG : रांची कसोटीच्या (IND Vs ENG) पहिल्या दिवसअखेर इंग्लंडचा डाव सावरला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाहुण्यांची धावसंख्या 7 विकेट्सवर 302 धावा आहे. जो रूट (Joe Root) 106 धावा करून नाबाद परतला. तर, ओली रॉबिन्सन 31 धावा करून क्रीजवर आहे.
सकाळी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंडचे सलामीवीर बेन डकेट आणि जॅक क्रॉलीने पहिल्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली, मात्र त्यानंतरही इंग्लिश फलंदाज एकापाठोपाठ पॅव्हेलियनकडे परतले.
जो रूटने ठोकले शतक
इंग्लंडचे टॉप-3 फलंदाज 57 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर जॉनी बेअरस्टोने काही चांगले फटके नक्कीच मारले, पण अश्विनच्या चेंडूवर तो बाद झाला. इंग्लिश फलंदाज ठराविक अंतराने बाद होत राहिले. पण जो रूटने घट्टपणे दुसरी बाजू लावून धरली. बेन फॉक्सशिवाय जो रूटने तळातील फलंदाजांना सोबत घेत भागीदारी रचली आणि दिवसअखेर सन्मानजनक धावसंख्या बनवली.
Ravichandran Ashwin : अश्विनचा पराक्रम! इंग्लंडविरुद्ध 100 विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज
इंग्लंडकडून सलामीवीर जॅक क्रॉलीने 42 धावा केल्या. त्याचवेळी, बेन डकेट 11 धावा करून बाद झाला. ओली पोप आपले खाते उघडू शकला नाही. तर जॉनी बेअरस्टोने 38 धावा केल्या. कर्णधार बेन स्टोक्स 3 धावा करून रवींद्र जडेजाचा विकेट ठरला. बेन फॉक्सने 47 धावांची चांगली खेळी केली. टॉम हार्टलीने 13 धावा केल्या.
Akash Deep : फक्त एक चूक अन् आऊट झालेला फलंदाज नॉट आऊट; आकाशदीपनं नेमकं काय केलं ?
पदार्पणात आकाश दीपची घातक गोलंदाजी
आकाश दीपने पदार्पणाच्या कसोटीत उत्कृष्ट गोलंदाजी केली. आकाश दीपने इंग्लंडच्या टॉप-3 फलंदाजांना आपली शिकार बनवले. मोहम्मद सिराजला 2 विकेट मिळाल्या. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. तर, कुलदीप यादव विकेट घेण्यात अपयशी ठरला.
Shiv Thakare ED Notice : बिग बॉस’च्या शिव ठाकरेला ‘ईडी’चे समन्स!…