वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; ‘या’ पाच खेळाडूंना संधी नाहीच
IND vs WI 2025 : बीसीसीआयने आज ऑक्टोबर महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.

IND vs WI 2025 : बीसीसीआयने आज ऑक्टोबर महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात बीसीसीआयने अनेक खेळाडूंना बाहेरचा रास्ता दाखवला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडे असणार आहे. तर उपकर्णधार म्हणून रवींद्र जडेजाची नियुक्ती करण्यात आली आहे. तेंडुलकर – अँडरसन ट्रॉफीमध्ये भारतीय संघात असणाऱ्या पाच खेळाडूंना या मालिकेतून आऊट करण्यात आले आहे. तर एका स्टार खेळाडूने या मालिकेत खेळण्यास नकार दिला आहे.
करुण नायर
तेंडुलकर – अँडरसन ट्रॉफीमध्ये (Tendulkar – Anderson Trophy) भारतीय संघात असणारा करुण नायर (Karun Nair) आता वेस्ट इंडिज कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात नसणार आहे. तेंडुलकर – अँडरसन ट्रॉफीच्या चार कसोटी समान्यात त्याने फक्त एक अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्थान देण्यात आलेले नाही.
अभिमन्यू ईश्वरन
इंग्लंड दौऱ्यासाठी एकही सामन्यात संधी न मिळालेल्या अभिमन्यू ईश्वरनला (Abhimanyu Easwaran) देखील भारतीय संघातून बाहेरचा रास्ता दाखवण्यात आला आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या मते, देशांतर्गत मालिकेत तिसऱ्या सलामीवीराची आवश्यकता नाही आणि जर अशी परिस्थिती उद्भवली तर त्याला निश्चितच संधी दिली जाईल.
🚨 Presenting #TeamIndia‘s squad for the West Indies Test series 🔽#INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/S4D5mDGJNN
— BCCI (@BCCI) September 25, 2025
आकाश दीप
इंग्लंड दौऱ्यावर शानदार कामगिरी करणारा आकाश दीपला देखील वेस्ट इंडिजविरुद्ध संघात स्थान देण्यात आलेला नाही. आकाश दीपने इंग्लंड दौऱ्यावर मालिका अनिर्णित करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र वेस्ट इंडिजविरुद्ध त्याला संधी मिळालेली नाही.
शार्दुल ठाकूर
इंग्लंड दौऱ्यावर दोन कसोटी सामन्यात फक्त दोन विकेट्स घेणारा शार्दुल ठाकूरला देखील संघात स्थान देण्यात आलेला नाही. शार्दुलने इंग्लंड दौऱ्यावर 27 षटके गोलंदाजी करत दोन विकेट घेतने होते. त्यामुळे भारतीय संघात त्याला स्थान देण्यात आले नाही.
अंशुल कंबोज
वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजला मँचेस्टर कसोटीत पदार्पणाची संधी देण्यात आली होती, परंतु त्याने फक्त एक विकेट मिळवली होती. मात्र आता अंशुलला संघातून वगळण्यात आले आहे.
मोठी बातमी, शाहरुख अन् गौरी खानविरुद्ध मानहानीचा खटला, समीर वानखेडे यांचा मानहानीचा आरोप
श्रेयस अय्यरने खेळण्यास दिला नकार
तर दुसरीकडे भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत खेळण्यास नकार दिला आहे. तंदुरुस्तीचे कारण देत त्याने रेड-बॉल क्रिकेटमधून ब्रेक घेतला. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले की जर अय्यर तंदुरुस्त असता तर तो वेस्ट इंडिज मालिकेत खेळला असता.