श्रेयस अय्यर टीम इंडियाचा कॅप्टन; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी भारत अ संघाची घोषणा

Shreyas Iyer

India A Squad Against Australia A : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सिलेक्शन कमिटीने श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध होणाऱ्या चार दिवसांच्या दोन सामन्यांसाठी भारत अ संघाची घोषणा झाली आहे. यात श्रेयस अय्यरला कर्णधारपदी संधी देण्यात आली आहे. तर ध्रुव जुरेलला उपकर्णधार केलं आहे. या मालिकेला येत्या 16 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी दिग्गज खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. दलीप ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये शतकाची संधी हुकलेल्या नारायण जगदीशनला संघात घेतले आहे. ऋतुराज गायकवाडला मात्र पुन्हा एकदा दुर्लक्षित करण्यात आले आहे.

दिलीप ट्रॉफीत सेमीफायनलमध्ये वेस्ट झोनकडून खेळणाऱ्या श्रेयस अय्यरला कर्णधार केले आहे. साई सुदर्शन, नितीशकुमार रेड्डी आणि प्रसिद्ध कृष्णा यांनाही संधी मिळाली आहे. विकेटकीपर ध्रुव जुरेलला थेट उपकर्णधार केलं आहे. दिलीप ट्रॉफीत सेमीफायनलमध्ये वेस्ट झोनकडून खेळताना ऋतुराज गायकवाडने चमकदार कामगिरी केली. ऋतुराजने 184 धावा केल्या होत्या. तरीदेखील या स्पर्धेसाठी त्याचा विचार झाला नाही. ईशान किशनलाही संघाबाहेर ठेवण्यात आले. त्यामुळे संघनिवडीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दुलीप ट्रॉफी 2024 साठी संघाची घोषित, श्रेयस अय्यर, शुभमन गिलसह ‘या’ स्टार खेळाडूकडे मोठी जबाबदारी

मालिकेचे वेळापत्रक ठरले

ऑस्ट्रेलिया अ आणि भारत अ यांच्यात चार दिवसीय दोन सामन्यांची मालिकेतील पहिला सामना 16 ते 19 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. दुसरा सामना 23 ते 26 सप्टेंबर दरम्यान लखनऊमध्ये होणार आहे. यानंतर 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या दरम्यान कानपूरमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी अजून संघाची घोषणा झालेली नाही. रिपोर्ट्सनुसार वनडे सीरिजसाठी रोहित शर्माला (Rohit Sharma) भारत अ संघात संधी मिळू शकते.

असा आहे भारत अ संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, नारायण जगदीशन (विकेटकीपर), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (उपकर्णधार), देवदत्त पड्डिकल, हर्ष दुबे, आयुष बडोनी, नितीशकुमार रेड्डी, तनुष कोटियन, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर बरार, खलील अहमद, मानव सुथार आणि यश ठाकूर.

Dhruv Jurel : ध्रुव जुरेल चमकला, थेट महेंद्रसिंग धोनीच्या यादीत स्थान पण 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube