आशियाई स्पर्धेसाठी टीम इंडिया जाहीर, मराठमोळा ऋतुराज गायकवाड कर्णधार

आशियाई स्पर्धेसाठी टीम इंडिया जाहीर, मराठमोळा ऋतुराज गायकवाड कर्णधार

Asian Games 2023: बीसीसीआयने सप्टेंबरमध्ये होणाऱ्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या 15 सदस्यीय पुरुष क्रिकेट संघाच्या नावाची घोषणा केली आहे. मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाड याला या संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. बीसीसीआयने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाचीही घोषणा केली आहे.

आयपीएलच्या गेल्या काही हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या अनेक युवा खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला असून त्यात रिंकू सिंगच्या नावाचाही समावेश आहे.तर महिला संघाच्या कर्णधारपदी हरमनप्रीत कौरची निवड करण्यात आली आहे तर स्मृती मानधना तिच्या उपकर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट स्पर्धा 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत टी-20 स्वरूपात खेळल्या जातील. 5 ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय विश्वचषक सुरू होत असल्याने या स्पर्धेसाठी युवा खेळाडूंचा संघ पाठवला जात आहे. या संघात ऋतुराज गायकवाड व्यतिरिक्त यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, टिळक वर्मा आणि रिंकू सिंग यांचाही समावेश आहे.

IND vs WI: टीम इंडियाने वेस्ट इंडिजला हरवून स्वतःचाच विक्रम मोडला, डॉमिनिकामध्ये केला हा पराक्रम

अर्शदीप सिंग व्यतिरिक्त मुकेश कुमार, आवेश खान, शिवम मावी यांचा भारताच्या या संघात वेगवान गोलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे. रवी बिश्नोई आणि शाहबाज अहमद यांचा या संघात फिरकीपटू म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर वॉशिंग्टन सुंदरचा अष्टपैलू खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.

चीनमध्ये तिसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. त्याचबरोबर त्यात तिसऱ्यांदा क्रिकेट स्पर्धाही आयोजित केली जात आहे. यापूर्वी 2010 आणि 2014 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता.

Kajol: काजोलचा ‘द ट्रायल’मधील खुल्लमखुल्ला ‘लिप लॉक’ सीन व्हायरल; नेटकरी म्हणे…

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघ:
ऋतुराज गायकवाड (C), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (wk), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (wk).

स्टँडबाय खेळाडू: यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ
हरमनप्रीत कौर (C), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (wk), अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली सरवानी, तीतस साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणी, कनिका आहुजा, उमा छेत्री, अनिल छेत्री

स्टँडबाय खेळाडू: हरलीन देओल, काशवी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक आणि पूजा वस्त्राकर

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube