Download App

Akash Deep : वडील अन् भावाला गमावलं, गरिबीमुळे क्रिकेटही सोडलं, आता पदार्पणातच ठरला ‘हुकूमी एक्का’

Akash Deep Story : पश्चिम बंगालचा वेगवान गोलंदाज आकाशदीपने (Akash Deep) इंग्लंविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय (IND vs ENG) क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यातच आकशदिपने जबरदस्त कामगिरी केली. त्याने इंग्लंडचे सुरुवातीचे तीन विकेट्स घेत कमाल केली. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या सामन्यात खेळत नसल्याने त्याच्या जागी आकशदीपला संधी मिळाली आहे. कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) त्याच्यावर दाखवलेला विश्वास आकाशदिपने सार्थ ठरवला.

राष्ट्रीय संघात निवड होणे आणि भारतीय संघासाठी प्रत्यक्ष मैदानात खेळणे हा प्रवास आकशसाठी सोपा नक्कीच नव्हता. मूळच्या बिहारच्या या खेळाडूने आयुष्यात खूपदा संघर्ष पाहिला आहे. कधी वडील आणि भावाच्या निधनाने तो खचून गेला तर कधी आर्थिक अडचणींमुळे क्रिकेट सोडावे लागले. आकाशने सरकारी नोकरी करावी असे त्याच्या वडिलांना नेहमी वाटायचे. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आकाशने अनेक परीक्षा दिल्या मात्र त्याच्या मनातील क्रिकेट काही केल्या जात नव्हते. अभ्यासात जास्त लक्ष लागत नव्हते पण क्रिकेटसाठी आकाश आवर्जून वेळ देत होता.

क्रिकेट सोडलं अन् बनले पक्के राजकारणी; ‘या’ खेळाडूंची ‘पॉलिटिक्स’ इनिंगही गाजली

आकाशने एकदा पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले होते की लहानपणी लोकांचे आणि मित्रांच्या कुटुंबीयांचे टोमणे सतत एकावे लागायचे. इतकेच काय तर त्यांच्या मुलांनाही माझ्यापासून लांब राहण्यास सांगत होते. मात्र त्या गोष्टी आता इतिहास झाल्या त्यामुळे आकाश आता कुणाला दोष देत नाही.

आकाशसाठी 2015 हे वर्ष खूप संकटांनी भरलेले राहिले. सहा महिन्यांच्या आताच आकाशच्या वडील आणि भावाचे निधन झाले. आकाशच्या घरी पैसे नव्हते. आईकडेही लक्ष द्यायचे होते. अडचणींचा विचार करून आकाशने तीन वर्षांसाठी क्रिकेट सोडले. नंतर त्याच्या लक्षात आले की आपण फार दिवस क्रिकेटपासून दूर राहू शकत नाही. पुढे आकाश दुर्गापूर आणि तेथून पुढे कोलकात्याला पोहोचला.

Ravichandran Ashwin : अश्विनचा पराक्रम! इंग्लंडविरुद्ध 100 विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज

कोलकात्यात राहण्यास सुरुवात केली. मित्राने त्याला खूप मदत केली. दुर्गापूरमध्ये असताना आकाशला क्लब क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. यावेळी आकाशच्या काकांनीही त्याला खूप मदत केली. काकांनी त्याला अडचणीतून बाहेर काढले आणि क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. आकाशने 2019 मध्ये बंगालसाठी पहिला प्रथम श्रेणी क्रिकेट सामना खेळला. याच वर्षी ‘अ’ श्रेणी आणि टी 20 सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली.

आकाशाची कारकीर्द

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एन्ट्री घेण्याआधी आकाशने बंगालसाठी 30 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने एकूण 104 विकेट्स घेतल्या आहेत. ‘अ’ श्रेणीतील 28 सामन्यात 42 तर 41 टी 20 सामन्यात 48 विकेट्स घेतल्या आहेत. टी 20 क्रिकेट लीग स्पर्धेत आकाश विराट कोहलीच्या (Virat Kohli) बंगळुरू संघाकडून खेळतो. या स्पर्धेतील सात सामन्यात 6 विकेट आकाशने घेतल्या आहेत.

follow us

वेब स्टोरीज