मुंबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur Wedding) आज लग्नाच्या बेडीत अडकला आहे. प्रेयसी मित्ताली परुळकरसोबत (Mittali Parulkar) त्याने लगिनगाठ बांधली. शार्दुलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शार्दुल-मिताली यांचं लग्न मोठ्या धूमधडाक्यात पार पडले.
लग्नाआधी हळदी आणि संगिताचा कार्यक्रम पार पडला होता. याचे काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर यांनीही शार्दूलच्या लग्नाला उपस्थिती दर्शवली होती. त्याशिवाय युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा, अभिषेक नायर आणि मुंबई संघातील काही खेळाडूंनीही लग्नाला उपस्थिती दर्शवली होती.
दोस्तीची ताकद, जुन्या आठवणींना उजाळा देताना बापट-नांदगावकरांचे डोळे पाणावले
शार्दुलची होणारी पत्नी मिताली परुळकर ही एक बिजिनेस वुमन आहे. तर पालघरचा असणारा शार्दूल आधी आयपीएलमधून सर्वांसमोर आला होता. भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर तिथेही त्याने आपली खास जागा बनवली. त्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने वॉशिंग्टन सुंदर सोबत मिळून ठोकलेलं एक अर्धशतक भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं होतं.
मर्यादीत षटकातही चमकदार कामगिरी करणारा शार्दूल एक महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय संघात आहे. संघाला विकेटची गरज असताना विकेट घेणारा आणि अडचणीच्या काळात फलंदाजी सांभळणारा अशी शार्दूलची ओळख आहे. शार्दूलने तिनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण केलं आहे. दरम्यान, 2021 नोव्हेंबरमध्ये शार्दूलचा साखरपुडा झाला असून त्याचा व्हिडीओ बराच व्हायरल झाला होता.