India World Cup Squad : विश्वचषकासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. या 15 जणांच्या संघात एकही लेग-स्पिनर आणि ऑफ-स्पिनर नाही. भारतातील बहुतांश खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी उपयुक्त असताना एकमेव चायनामन गोलंदाज कुलदीप यादव संघात आहे. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे डावखुरे स्लो ऑर्थोडॉक्स गोलंदाज आहेत. कुलदीप यादवला चायनामन गोलंदाज म्हटले जाते. चायनामन गोलंदाजापुढे चांगले चांगले फलंदाज चाचपडत खेळतात.
चायनामन ही गोलंदाजीची शैली नाही, तर ती एक ‘शिवी’ होती जी नंतर गोलंदाजीची शैली बनली आणि क्रिकेटमध्ये वापरली जाऊ लागली. चायनामन म्हणजे – चीनमधील व्यक्ती. चीनमध्ये क्रिकेटमध्ये काही विशेष भविष्य दिसत नाही, परंतु मनोरंजक गोष्ट म्हणजे क्रिकेटचा पहिला चायनामन गोलंदाज (एलिस अचॉन्ग) हा चिनी वंशाचा होता. सुरुवातीच्या काळात चायनामन गोलंदाज म्हणून पहिले नाव दक्षिण आफ्रिकेचे चार्ली लेवेलिन यांचे होते. परंतु एलिस इचॉन्ग यांना चायनामन जनक मानले जाते.
भारताच्या वर्ल्डकप संघात दोन सर्वात मोठ्या कमजोरी, ‘या’ त्रुटींवर अनेकांनी बोट ठेवले
इंग्लंड आणि विंडीज यांच्यातील कसोटी सामना
कुलदीपसारख्या बॉलिंग अॅक्शन असलेल्या फिरकीपटूला चायनामन म्हणून संबोधण्याची कहाणी खूप रंजक आहे. ही घटना 25 जुलै 1933 ची आहे, जेव्हा मँचेस्टरमध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी सामना खेळला जात होता. वेस्ट इंडिजकडून डावखुरा फिरकी गोलंदाज एलिस इचॉन्ग गोलंदाजी करत होता. इचॉन्ग हे मूळचे चीनचे होते. इचॉन्गने मनगटाच्या सहाय्याने अनपेक्षित चेंडू टाकला, जो ऑफवरुन लेगकडे वळला. फलंदाजी करणाऱ्या वॉल्टर रॉबिन्सला टर्न समजू शकला नाही आणि तो बाद झाला.
फलंदाज रॉबिन्सला राग आला. आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना त्याने पंच जे. हार्डस्टाफला सांगितले, ‘या मूर्ख चायनामनने केलेलं फसवले… आणि मी आऊट झालो’. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर रिची बेनॉडने याचा खुलासा केला होता. यानंतर इचॉन्गसारख्या चेंडूंना चायनामन म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि नंतरच्या काळात, मनगटाच्या साहाय्याने टर्न करणाऱ्या कोणत्याही डावखुऱ्या फिरकीपटूला चायनामन गोलंदाज म्हटले जायचे.
World Cup 2023 : चमकदार कामगिरी करूनही निवडकर्त्यांचं मनं जिंकू न शकलेले पाच खेळाडू
चायनामन कोणाला म्हणतात?
जेव्हा डावखुरा फिरकी गोलंदाज त्याच्या बोटांऐवजी त्याच्या तळहाताने चेंडू फिरवतो तेव्हा त्याला चायनामन गोलंदाज म्हणतात. चायनामन गोलंदाजाचा चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी आतून वळतो, तर डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी तो बाहेर वळतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर असे फार कमी गोलंदाज आहेत, ज्यांना चायनामन म्हणून ओळख मिळाली.
85 वर्षाच्या इतिहासात पहिला चायनामन बॉलर
यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा पॉल अॅडम्स, ऑस्ट्रेलियाचा मायकेल बेवन, सायमन कॅटिच, ब्रॅड हॉग, श्रीलंकेचा लक्ष रंगिका आणि भारताचा कुलदीप यादव यांचा समावेश आहे. तबरेझ शम्सी (दक्षिण आफ्रिका), मायकेल रिप्पन (नेदरलँड्स), लक्ष संदाकन (श्रीलंका) हे खेळाडूही आता या यादीत सामील झाले आहेत. भारतीय क्रिकेटच्या 85 वर्षाच्या इतिहासात कुलदीप यादव पहिला चायनामन बॉलर आहे.