Ravichandran Ashwin : भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 765 विकेट घेतल्यानंतर आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ऑस्ट्रेलिया (Australia) विरूध्द सुरु असलेला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर अश्विनने सर्वांना धक्का देत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती झाहीर केली.
अश्विनने शेवटाचा सामना ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलिया विरुध्द खेळला होता मात्र या सामन्यात त्याला फार काही विशेष करता आलं नाही. मात्र आता अश्विनने स्वता निवृत्ती घेतली की त्याला निवृत्त होण्यासाठी दबाव टाकण्यात आला याबाबात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
खराब कामगिरीमुळे अश्विनवर दबाव
भारतीय संघासाठी गेल्या दहा वर्षांपासून आघाडीचा फिरकी गोलंदाज होता. भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा अश्विन दुसरा गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी भारतीय संघात सर्वकाही ठीक होतो. अश्विने भारतात झालेल्या न्यूझीलंडविरुध्दच्या मालिकेतही दमदार कामगिरी केली होती. तर आपल्या शेवटच्या सामन्यात 1 विकेट घेतला होता.
तर दुसरीकडे भारतीय कर्णधार रोहित शर्मानुसार, अश्विनला पर्थमध्येच निवृत्तीची घोषणा करायची होती, पण कर्णधाराच्या विनंतीवरून तो थांबला. अशा स्थितीत अश्विन विदेशी भूमीवर प्रभावी ठरत नसल्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आले, त्यानंतर त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. कारण की, तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्या जागी रवींद्र जडेजाला भारतीय संघात स्थान देण्यात आले. त्यामुळेच अश्विनने निवृत्ती घेतली असल्याची चर्चा आहे.
करिअरच्या शेवटच्या टप्प्यात दुर्लक्ष
अश्विन कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात होता यात काहीच शंका नाही. अश्विनने आपल्या 14 वर्षांच्या कारकिर्दीत भारताला अनेक सामने जिंकून दिले. मात्र करिआच्या शेवटच्या टप्प्यात त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप देखील सोशल मीडियावर करण्यात येत आहे.
वाढत्या वयाचा परिणाम
करिआच्या शेवटच्या टप्प्यात दुर्लक्ष होत असताना अश्विनचे वाढलेले वय हे त्याच्या निवृत्तीचे आणखी एक कारण होऊ शकते. भारतासाठी 100 कसोटी सामन्यांमध्ये 537 बळी घेणारा अश्विन काही दिवसात 39 वर्षांचा होणार आहे. टीम इंडियामध्ये अश्विन गोलंदाजीसोबत फलंदाजीही करतो. अश्विनसाठी या वयातही फिटनेस राखणे आव्हान ठरले असावे, त्यामुळेच त्याने निवृत्ती जाहीर केली असल्याची चर्चा देखील सोशल मीडियावर करण्यात येत आहे.