Download App

टीम इंडियाला आजच मिळणार फायनलचं तिकीट!; जाणून घ्या, श्रीलंकेतील हवामान

  • Written By: Last Updated:

Ind Vs Sri-lanka Asia Cup 2023 : सतततच्या पावसाच्या व्यत्ययानंतरही अखेर भारतीय संघाने पाकिस्तान संघाचा 228 धावांच्या फरकाने मोठा पराभव केला. सुपर 4 मधील भारताचा हा पहिलाच सामना होता. त्यानंतर आज (दि.12) भारतीय संघाचा मुकाबला श्रीलंकेशी होणार आहे. हा सामना भारताने जिंकल्यास त्याच अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे. परंतु, सुपर 4 मधील भारत आणि श्रीलंका संघातील सामन्यातील पावसाचा व्यत्यय येणार का हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. (India Vs Sri-Lanka Match Update)

KL Rahul: ‘जावयाला कुठे ठेवू आणि कुठे नको’; सुनिल अन् अथिया शेट्टीने केलं दणक्यात सेलिब्रेशन

भारत आणि श्रीलंका संघामध्ये होणारा आजचा सामना कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. याच मैदानावर भारतीय संघाने पाकिस्तानचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे.

आजचे हवामान कसे असणार?

भारत आणि पाकिस्तान या संघामध्ये 10 सप्टेंबर रोजी सामना नियोजित होता. परंतु, सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे हा सामना राखीव दिवशी म्हणजे (दि.11) सोमवारी खेळवला गेला. त्यानंतर आज श्रीलंका आणि भारत आमनेसामने भिडणार असून, आजच्या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. Weather.com नुसार, भारत-श्रीलंका सामन्याच्या दिवशी कोलंबोमध्ये पाऊस कोसळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसामुळे सामन्याची षटके कमी केली जाऊ शकतात.

Asia Cup 2023 : किंग कोहलीने ठोकले 47 वे शतक, सचिनचा विक्रम मोडला

कोलंबोमधील स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आकाश ढगाळ असेल पण पाऊस पडणार नाही. हवामान स्वच्छ राहील असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. मात्र, दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आला असून, संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत हवामान स्वच्छ राहील असे सांगण्यात आले आहे. तर, रात्री 10 नंतर पुन्हा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

विराट कोहलीने सचिनचा विक्रम मोडला
विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात 84 चेंडूत शतक पूर्ण केले आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 13000 धावा करणारा फलंदाज बनला. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता, मात्र आता कोहलीने त्याच्याही पुढे गेला आहे. सचिनने 321 डावात तेरा हजार एकदिवसीय धावा केल्या होत्या तर कोहलीने 267 व्या डावात हा पराक्रम केला होता.

Tags

follow us