Download App

Asia Cup 2023 : थरारक सामन्यात श्रीलंकेने मारली बाजी; बांग्लादेश आशिया कपमधून आऊट

Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धेतील (Asia Cup 2023) सुपर 4 फेरीतील सामन्यात काल बांग्लादेश आणि श्रीलंका भिडले. या अटीतटीच्या आणि तितक्याच थरारक सामन्यात श्रीलंकेच्या (Sri Lanka) संघाने बांग्लादेशचा 21 धावांनी पराभव केला. या पराभवाबरोबरच बांग्लादेशचे (Bangladesh) स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. बांग्लादेशसाठी हा सामना करा किंवा मरा अशा स्थितीतील होता. त्यामुळे स्पर्धेत टिकायचे असेल तर संघाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचाच होता. मात्र, संघ हा सामना जिंकू शकला नाही. या सामन्यात बांग्लादेशने श्रीलंकेला जोरदार टक्कर दिली. तॉहीद हृदाय याने सर्वाधिक 82 धावा केल्या. मात्र, श्रीलंकेच्या महीश थेक्षणा, दासनू शनाका आणि मथीशा पथीराणा या तिघांनी बांग्लादेशला 48.1 ओव्हर्समध्ये 236 धावांवरच थांबवले.

श्रीलंकेने दिलेल्या 258 धावांच्या आव्हानाचा (Asia Cup 2023) पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांग्लादेश संघाची सुरुवात दमदार झाली. पहिल्या दोन फलंदाजांनी 55 धावांची भागीदारी केली. त्यानंतर आलेल्या खेळाडू्नेही 28 धावा केल्या. यानंतर मात्र विकेट पडण्यास सुरुवात झाली. नईम 21, कप्तान शाकीब 3 आणि लिटन दास यान 15 धावा केल्या. त्यानंतर मुशफिकर आणि तॉहीद यांनी पाचव्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली.

त्यानंतर तॉहीद आऊट झाला आणि संघाच्या विजयाची अखेरची शक्यताही मावळली. तॉहीदनंतर  (Asia Cup 2023) आलेले फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. बांग्लादेशचा संपूर्ण संघ 236 धावांत तंबूत परतला. श्रीलंकेकडून महीश थेक्षणा, दासून शनाका आणि मथीशा पथीराणा या तिघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर दुनिथ वेलगाने 1 विकेट घेतली.

IND vs PAK : सुपर फोरमध्ये भारत-पाकिस्तान महामुकाबला, कसे असेल कोलंबोतील हवामान?

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेसाठी कुसल मेंडिस आणि सदिरा (Asia Cup 2023) समरविक्रमाने मोठं योगदान दिले. कुसल मेंडिसने 73 चेंडूत 50 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर सदिरा समरविक्रमाने 72 चेंडूत 93 धावा केल्या. या समरविक्रमाने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 2 षटकार मारले. तत्पूर्वी, बांगलादेशचा कर्णधार शकिबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

सदिरा समरविक्रमा आणि कुसल मेंडिस चमकले…
श्रीलंकेचे सलामीवीर पथुम निशांक आणि दिमुथ करुणारत्ने यांनी पहिल्या विकेटसाठी 34 धावांची (Asia Cup 2023) भागीदारी केली. पथुम निशांकने 60 चेंडूत 40 धावा केल्या. तर दिमुथ करुणारत्नेने 17 चेंडूत 18 धावा केल्या. यानंतर कुसल मेंडिसने महत्त्वपूर्ण खेळी केली. मात्र, यानंतर फलंदाजीला आलेले चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा आणि कर्णधार दाशून शनाका झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले. पण सदिरा समरविक्रमाने एक बाजू लावून धरली.

Tags

follow us