IND vs PAK : सुपर फोरमध्ये भारत-पाकिस्तान महामुकाबला, कसे असेल कोलंबोतील हवामान?
Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी होणाऱ्या सुपर फोर सामन्यासाठी राखीव दिवस जाहीर झाल्यापासून क्रिकेटप्रेमींचा जीव टांगणीला लागला आहे. आता काही तासांनंतर जेव्हा दोन्ही संघ कोलंबोमध्ये आमनेसामने येतील, तेव्हाही हवामान पल्लेकेलेसारखेचं राहणार आहे. म्हणजेच पावसाचा धोका अजूनही कमी झालेला नाही.
साखळी फेरीत पावसाचा व्यत्यय आल्याने सामना रद्द करण्यात आला होता. भारताच्या नेपाळविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यावरही याचा परिणाम झाला. त्यानंतर रोहित आणि कंपनीला सुधारित लक्ष्य मिळाले. त्याचप्रमाणे कोलंबोमध्येही पावसामुळे सामना रद्द होण्याची भीती आहे.
अंदाज काय सांगतो?
हवामान अंदाजानुसार रविवारच्या सामन्यात पावसाची शक्यता 90 टक्के आहे. यामुळे सोमवार हा सामन्यासाठी राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे, परंतु अंदाजानुसार राखीव दिवशी 90% ऐवजी 100% पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोलंबोमध्ये चमत्कार घडला आणि हवामान स्वच्छ झाले तर भारत 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या रंगीत तालीमसाठी मैदानात उतरले.
मागील पाच सामन्यांची कामगिरी
भारताने आपल्या शेवटच्या पाच एकदिवसीय सामन्यांपैकी तीन जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत, तर पाकिस्तानी संघाने पाच पैकी पाच, म्हणजे शेवटचे पाच सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे.
हे रेकॉर्ड बनतील?
– बाबर आझमने आणखी एक शतक झळकावल्यास तो पाकिस्तानसाठी सर्वाधिक शतकांच्या बाबतीत सईद अन्वरसोबत संयुक्तपणे अव्वल स्थानावर येईल.
– रवींद्र जडेजा त्याच्या 200व्या विकेटपासून तीन विकेट दूर आहे. हा टप्पा गाठून तो अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांच्यानंतरचा तिसरा भारतीय फिरकीपटू ठरणार आहे.
डेव्हिड वॉर्नरने 85 चेंडूत ठोकले शतक, सचिन तेंडुलकरचाही विक्रम मोडला
भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह. , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि प्रसिध कृष्णा.