Asia Cup 2025 : पुढील महिन्यात होणाऱ्या आशिया कप 2025 (Asia Cup 2025) साठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असणार आहे मात्र सर्व सामने यूएईमध्ये (UAE) खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे आशिया कप 2025 मध्ये 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान (INDvsPaK) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामना होणार आहे. मात्र भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये अशी मागणी जोर धरत असल्याने हा सामना होणार की नाही याबाबात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर आता आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे.
भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार?
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये अशी मागणी भारतातून होताना दिसत आहे. तर दुसरीकडे याबाबत बोलताना एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभान अहमद म्हणाले की, आम्ही कोणतीही हमी देऊ शकत नाही, परंतु आशिया कपची तुलना WCL सारख्या खाजगी कार्यक्रमाशी करणे योग्य नाही. जेव्हा आशिया कप खेळण्याचा निर्णय घेतला जातो तेव्हा सरकारची परवानगी आधीच घेतली जाते. त्यामुळे आशा आहे की WCL सारखी परिस्थिती निर्माण होणार नाही. असं एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभान अहमद म्हणाले.
Kapil Sharma : मोठी बातमी, कपिल शर्माच्या कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार
आशिया कप 2025 टी-20 स्वरुपात
आशिया कप 2025 टी-20 स्वरुपात होणार आहे. या स्पर्धेत आठ संघ भाग घेणार आहे. भारत आणि पाकिस्तान यूएई आणि ओमानसह ग्रुप ए मध्ये आहेत, तर ग्रुप बी मध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांचा समावेश आहे. जर दोन्ही संघ सुपर फोर आणि फायनलमध्ये पोहोचले तर भारत आणि पाकिस्तान तीनदा एकमेकांसमोर येऊ शकतात.