शुभमन गिलला डच्चू; इशान किशनचे कमबॅक ! अक्षर पटेल उपकर्णधार, टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा

India's squad for T20 World Cup 2026: गोलंदाज अर्शदीप सिंग आणि धडाकेबाज फलंदाज इशान किशनचे संघात कमबॅक झाले आहे.

  • Written By: Published:
indias-squad-for-t20-world-cup-2026-india-left-out-shubman-gill

India’s squad for T20 World Cup 2026: आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा झालीय. उपकर्णधार शुभमन गिलला संघातून वगळण्यात आले आहेत. तर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाचे जबाबदारी देण्यात आली आहे. गोलंदाज अर्शदीप सिंग आणि धडाकेबाज फलंदाज इशान किशनचे संघात कमबॅक झाले आहे. हाच संघ न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. (indias-squad-for-t20-world-cup-2026-india-left-out-shubman-gill)

7 फेब्रुवारीपासून टी-20 वर्ल्डकप 2026 चा थरार रंगणार असून ८ मार्चपर्यंत या स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत. भारत आणि श्रीलंका संयुक्तरित्या यंदाच्या वर्ल्डकपचे आयोजन करणार आहे. टी-20 वर्ल्डकप 2026 च्या स्पर्धेत 30 दिवसांच्या कालावधीत एकूण 55 सामने खेळवण्यात येणार असून 20 संघ एकमेकांना भिडणार आहेत.

ईशान किशन याने सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीच्या स्पर्धेत केलेल्या कामगिरीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या ट्रॉफीत ईशान किशन याने 197 च्या स्ट्राईक रेटने 33 षटकारांसह 517 धावा ठोकल्या आहेत. त्याचप्रमाणे ईशान किशनच्या नेतृत्वात झारखंडने पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचं जेतेपद पिकवला आहे.

सूर्यकुमार यादव-कर्णधार
अभिषेक शर्मा
संजू सॅमसन
तिलक वर्मा
हार्दिक पंड्या
शिवम दुबे
अक्षर पटेल
रिंकू सिंग
जसप्रीत बुमरा
हर्षित राणा
अर्शदिप सिंग
कुलदीप यादव
वरुण चक्रवर्ती
वॉशिंगटन सुंदर
इशान किशन

follow us