Ind Vs Pak : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची पहिली इनिंग पार पडली असून पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान संघाने भारतासमोर 128 धावांचं आव्हान ठेवलं असून आता भारतीय संघ पाकिस्तान संघाने दिलेलं आव्हान कसं पेलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सामन्यात नेमकं काय-काय घडलं?
हार्दिक पांड्याच्या पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानला धक्का बसला. सैम अयुब पहिल्याच चेंडूवर बाद होत तंबूत परतला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. बुमराहने झेल पकडत पहिली विकेट घेतली.
IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? टीम इंडियाच्या गोटात तणाव; कोच गंभीरने..
त्यानंतर भारताने पाकिस्तानला दुसऱ्याच ओव्हरमध्ये दुसरा झटका दिला. हार्दिक पंड्याने सामन्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये पाकिस्तानला पहिला झटका दिला होता.तर जसप्रीत बुमराहने दुसऱ्या ओव्हरमधील दुसऱ्याच ओव्हरमध्ये विकेट मिळवली. बुमराहने मोहम्मद हारीस याला हार्दिक पंड्या याच्या हाती कॅच आऊट केलं. हारीसने 5 बॉलमध्ये 3 धावा केल्या होत्या.
टीम इंडियाने पाकिस्तानला पावरप्लेमधील 6 ओव्हरमध्ये एकूण 2 झटके दिले. हार्दिक पंड्याने सॅम अयुब याला झिरोवर आऊट केलं. तर जसप्रीत बुमराह याने मोहम्मद हारीसला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. पाकिस्तानने पावरप्लेमध्ये 2 विकेट्स गमावून 42 धावा केल्या.
सावधान! पुढील 72 तासांत अतिमुसळधार कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी
कुलदीप यादवने पाकिस्तानला सातवा आणि मोठा झटका दिला. कुलदीपने सेट बॅट्समन साहिबजादा फरहान याला आऊट केलं. कुलदीपने यासह तिसरी विकेट मिळवली. साहिबजादाने 3 सिक्स आणि 1 फोरसह 44 बॉलमध्ये 40 रन्स केल्या. तसेच वरुण चक्रवर्ती याने पाकिस्तानला आठवा झटका देत वैयक्तिक पहिली विकेट मिळवली. वरुणने फहीम अश्रफ याला पाकिस्तानच्या डावातील 18 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर एलबीडब्ल्यू आऊट केलं. फहीमने 14 बॉलमध्ये 11 रन्स केल्या.