Asia Cup 2025 India vs Pakistan : आशिया कप 2025 च्या सुपर फोर लढतीत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला जात आहे. दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान प्रथम फलंदाजी करत आहे. बुमराह आणि वरुण चक्रवर्ती परतले आहेत. अर्शदीप आणि हर्षित राणा यांना वगळण्यात आले आहे. पाकिस्तानी संघातही दोन बदल करण्यात आले आहेत. या सामन्यात कर्णधार सूर्याने कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूशी हस्तांदोलन केले नाही. गेल्या रविवारी, 14 सप्टेंबर रोजी जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने आले तेव्हा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सात विकेट्सनी शानदार विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानकडून फखर झमान आणि फरहानने डावाची सुरुवात (Asia Cup 2025) केली. अभिषेक शर्माने पहिल्याच षटकात फरहानचा सोपा झेल सोडला. पाकिस्तानने पहिल्याच षटकात 6 धावा केल्या. पण जेव्हा हार्दिकने त्याचे दुसरे आणि (India vs Pakistan) सामन्यातील तिसरे षटक टाकले तेव्हा त्याने फखर झमानला बाद केले. फखर 15 धावांवर बाद (cricket) झाला. संजूने एक शानदार झेल घेतला.
🚨 Toss & Playing XI Update 🚨#TeamIndia elected to bowl in their first game of #Super4.
Here’s our line-up for today 🔽
Updates ▶️ https://t.co/CNzDX2HcvN#AsiaCup2025 pic.twitter.com/NfLpdZkGGd
— BCCI (@BCCI) September 21, 2025
भारतीय संघ : अभिषेक शर्मा, शुभमन गिल , संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
पाकिस्तान संघ: सॅम अयुब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हरिस (यष्टीरक्षक), फखर जमान, सलमान अली आगा (कर्णधार), फहीम अश्रफ, हुसेन तलत, मोहम्मद नवाज, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ आणि अबरार अहमद.
आशिया कपमध्ये भारतीय संघाने सातत्याने पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले आहे . दोन्ही संघांनी आशिया कपमध्ये एकदिवसीय आणि टी-20 सह एकूण 20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये भारताने 11 सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने सहा जिंकले आहेत, तर तीन सामने अनिर्णीत राहिले आहेत. भारत आणि पाकिस्तानने आशिया कपच्या टी-20 फॉरमॅटमध्ये चार सामने खेळले आहेत. भारताने तीन जिंकले आणि पाकिस्तानने एक जिंकला. एकूणच, भारताने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या काळात टीम इंडियाने 11 सामने जिंकले, तर पाकिस्तानने तीन जिंकले. याचा अर्थ सांख्यिकीयदृष्ट्या भारतीय संघ वरचढ आहे.