Asia Cup 2025 : देशभरातील क्रिकेट प्रेमींमध्ये सध्या एकचं चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. ती म्हणजे आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान या दोन संघांत फायनल सामना खेळला जाणार का? यासह अनेक प्रश्न अनेकांना पडले आहेत. आशिया कप स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. स्पर्धेतील टॉपचे 4 संघ देखील निवडले गेले आहेत. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमधील उत्साह देखील शिगेला पोहोचला आहे.
सोशल मीडियावर देखील सध्या आशिया कपचीचं (Asia Cup 2025) चर्चा जोराने सुरु आहे. तर दुसरकडे या स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार असल्याची चर्चा देखील चाहाते सोशल मीडियावर करताना दिसत आहे. मात्र आज आशिया कप सुपर 4 मध्ये पाकिस्तान श्रीलंकेशी (PakvsSL) भिडणार आहे. या सामन्यात जर पाकिस्तानचा संघ पराभव झाला तर पाकिस्तान जवळपास या स्पर्धेतून बाहेर होणार आहे.
सुपर 4 मध्ये पाकिस्तानने आपला पहिला सामना भारताविरुद्ध गमावला आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेला देखील या सामन्यात विजय आवश्यक आहे. सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात रोमहर्षक सामन्यात बांग्लादेशने श्रीलंकेचा पराभव केला होता. त्यामुळे आज होणारा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. दोन्ही संघांपुढे करो या मरो अशी स्थिती आहे.
आबूधाबीमध्ये होणाऱ्या या सामन्यात पाकिस्तानचा संघ जर पराभूत झाला तर ते या स्पर्धेतून बाहेर होण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर त्यांचा शेवटचा सामना हा बांग्लादेशच्या संघासोबत होईल. या सामन्यात जरी पाकिस्तानच्या संघाने बाजी मारली तरी त्यांना फायनलमध्ये प्रवेश मिळू शकणार नाही. हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे की, स्पर्धेमधील टॉप 4 जे संघ असतील त्यातील दोन संघांमध्ये फायनलचा सामना खेळला जाणार आहे. एकंदरीत पाहता आजच्या सामन्यात पाकिस्तानचं आशिया कपमधील भवितव्य ठरणार आहे.
जन आरोग्य योजनेसाठी निधी अन् ‘या’ शहरात हॉस्पिटलसाठी हॉस्पीटलसाठी जागा; फडणवीस सरकारचे 8 मोठे निर्णय
आशिया कप 2025 च्या सुपर 4 मध्ये भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला होता. तर दुसरीकडे बांग्लादेशने सुपर 4 मध्ये श्रीलंकेचा 4 विकेट्सने पराभव करत सर्वांना धक्का दिला आहे. त्यामुळे आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात कोण पोहोचणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी होणार आहे.