पाकिस्तान घाबरला, आशिया कप 2025 मध्ये खेळणार; UAE विरुद्ध एक तास उशिरा सुरु होणार सामना

Asia Cup 2025 : आशिया कप 2025  पाकिस्तानने खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आशिया कप 2025 मध्ये आज होणारा पाकिस्तानविरुद्ध युएई

  • Written By: Published:
Asia Cup

Asia Cup 2025 : आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानने खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आशिया कप 2025 मध्ये आज होणारा पाकिस्तानविरुद्ध युएई सामना एक तास उशिरा सुरु होणार आहे. शेक हॅन्ड वादामुळे पाकिस्तानने या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा पाकिस्तानी मीडियाकडून करण्यात आला होता मात्र आता समोर आलेल्या माहितीनूसार पाकिस्तान आशिया कप 2025 मध्ये खेळण्यास तयार झाला आहे.

पीसीबीने (PCB) आपल्या खेळाडूंना हॉटेलमध्ये राहण्याचे आणि मैदानात न जाण्याचे आदेश दिले असल्याचा दावा पाकिस्तानी मीडियाकडून काही वेळापूर्वी करण्यात आला होता. मात्र आता पीसीबीने सांगितले की ते आयसीसीसोबत (ICC) हा प्रश्न सोडवण्यासाठी काम करत आहेत आणि म्हणूनच बहिष्कार टाकण्याऐवजी सामना सुरू होण्यास एक तास उशीर करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे आज पाकिस्तान ग्रुप ए मध्ये युएईविरुद्ध (PAKvsUAE) नॉकआऊट सामना खेळणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ टीम इंडियासोबत सुपर फोरमध्ये प्रवेश करणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

भारताविरुद्ध 14 सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी शेक हॅन्ड करण्यास नकार दिल्यानंतर वाद सुरु झाला होता. पाकिस्तान बोर्डाने दावा केला की रेफरी पायक्रॉफ्टने भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा यांना टॉस दरम्यान शेक हॅन्ड करु नये असे सांगितले. यानंतर पाकिस्तानने आयसीसीकडे रेफरी पायक्रॉफ्ट यांनी आशिया कपमधून बाहेर काढण्यात यावे अशी मागणी करण्यात आली तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास युएईविरुद्धच्या सामन्यावर आणि संपूर्ण स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकीही दिली होती.

मोठी बातमी, ईव्हीएमवर दिसणार आता उमेदवारांचे रंगीत फोटो; निवडणूक आयोगाची घोषणा

follow us