Download App

India Vs Pakistan ; पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताची उपांत्य फेरीत धडक

India Vs Pakistan Hockey Match ; आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 च्या शेवटच्या साखळी सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 4-0 असा पराभव केला. भारतासाठी हरमनप्रीतने सामन्यात दोन गोल केले. एक गोल जुगवीर सिंगने तर एक गोल आकाशदीपने केला. उपांत्य फेरीत भारताचा सामना जपानशी होणार आहे. त्याचबरोबर या पराभवाने पाकिस्तानचे उपांत्य फेरीत खेळण्याचे स्वप्नही भंगले आहे.

भारतीय हॉकी संघाने बुधवारी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 मध्ये पाकिस्तानविरुद्ध एकतर्फी विजय नोंदवला. चेन्नईच्या महापौर राधाकृष्णन स्टेडियमवर भारताने पाकिस्तानचा 4-0 असा धुव्वा उडवला. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंग, जुगराज सिंग आणि मनदीप सिंग चमकले. हरनप्रीतने दोनदा (15वे, 23वे मिनिट) तर जुगराज (36वे मिनिट) आणि मनदीप (55वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला.

तुमचा डेटा संमतीशिवाय वापरता येणार नाही, डिजिटल डेटा प्रोटेक्शन बिल राज्यसभेतही मंजूर

लीग टप्प्यातील हा शेवटचा सामना होता. भारतीय संघाने आधीच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. शुक्रवारी उपांत्य फेरीत भारताचा सामना जपानशी होणार आहे. भारत या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे. भारताने चार साखळी सामने जिंकले तर एक अनिर्णित राहिला. त्याचवेळी पाकिस्तानला केवळ एकच सामना जिंकता आला. पाकिस्तानने चीनवर 2-1 ने मात केली. पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर आहे. पाचव्या स्थानासाठी पाकिस्तानचा सामना चीनशी होईल.

Tags

follow us