Asian Games 2023 : आणखी एक ‘सुवर्ण’वेध! एअर पिस्टल प्रकारात टीम इंडिया अव्वल

Asian Games 2023 : चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत पदकांचा पाऊसच पाडला आहे. आताही 10 मीटर एअर पिस्टल प्रकरात पुरुषांच्या टीमने सुवर्णपदकाचा वेध घेतला. सांगिक क्रीडा प्रकारात सरबज्योत सिंग, अर्जुन सिंग आणि शिवा नरवाल या तिघांनी गोल्ड मेडल जिंकलं. आजच्या दिवसात भारताने एक रौप्य आणि एक […]

Asian Games

Asian Games

Asian Games 2023 : चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत पदकांचा पाऊसच पाडला आहे. आताही 10 मीटर एअर पिस्टल प्रकरात पुरुषांच्या टीमने सुवर्णपदकाचा वेध घेतला. सांगिक क्रीडा प्रकारात सरबज्योत सिंग, अर्जुन सिंग आणि शिवा नरवाल या तिघांनी गोल्ड मेडल जिंकलं. आजच्या दिवसात भारताने एक रौप्य आणि एक सुवर्णपदकाची कमाई केली. याआधी भारताच्या रोशिबिना देवी हीने वुशू क्रीडा प्रकारात रौप्यपदक मिळवले.

या यशानंतर एअर पिस्टल क्रीडा प्रकारात मात्र भारताने थेट गोल्ड मेडलवरच निशाणा साधाला. या प्रकारात भारताच्या टीमने यशस्वी कामगिरी केली. सरबज्योत आणि अर्जुन यांनी अनुक्रमे पाचवा आणि आठवा क्रमांक मिळवला. यामुळे दोघेही वैयक्तिक शुटिंगमध्ये अंतिम फेरीत पोहोचले. त्यामुळे आता या दोघांनाही वैयक्तिक पदक मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास भारताच्या खात्यात आणखी पदके पडतील.

घोडेस्वारीत तब्बल 41 वर्षांनंतर सुवर्ण कामगिरी

याआधी तीन दिवसांपू्र्वी भारताने ऐतिहासिक कामगिरी करत घोडेस्वारीत तब्बल 41 वर्षानंतर सुवर्णपदक जिंकले. भारताने 1982 नंतर प्रथमच या प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले. या स्पर्धेत भारत पहिल्यांदाच सहभागी झाला आहे. त्यामुळे भारताला सुवर्णपदकाची आशा तर सोडाच, कोणतेही पदक मिळण्याची शक्यता नव्हती. पण अशा कठिण परिस्थितीत या खेळाडूंनी अपेक्षेपलीकडे जाऊन इतिहास रचला आहे.

Asian Games : भारतासाठी ‘सुवर्ण’ दिन; तब्बल 41 वर्षांनंतर घोडेस्वारीत मिळवलं ‘गोल्ड’ मेडल

भारतासाठी सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या घोडेस्वारांमध्ये सुदीप्ती हाजेला, दिव्यकीर्ती सिंग, हृदय छेडा आणि अनुष अग्रवला यांच्या नावाचा समावेश आहे. या खेळाडूंनी सुवर्ण जिंकल्यानंतर काही वेळातच भारताने याच खेळाच्या एकाच स्पर्धेत एक रौप्य पदक आणि एक कांस्य पदकही पटकावले.

Exit mobile version